ब्रेड पिझ्झा कप्स | Bread Pizza Cups Recipe in Marathi

प्रेषक sapana behl  |  5th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Bread Pizza Cups by sapana behl at BetterButter
ब्रेड पिझ्झा कप्स by sapana behl
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3310

0

Video for key ingredients

  ब्रेड पिझ्झा कप्स

  ब्रेड पिझ्झा कप्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Bread Pizza Cups Recipe in Marathi )

  • 6 गव्हाच्या ब्रेडचे काप
  • 1/4 वाटी चिरलेली हिरवी भोपळा मिरची
  • 1/4 वाटी चिरलेली पिवळी भोपळा मिरची
  • 1/4 वाटी चिरलेला कांदा
  • 1/4 वाटी चिरलेला टोमॅटो
  • 1 चिरलेली हिरवी मिरची
  • अर्धी वाटी पिझ्झा सॉस
  • 1 मोठा चमचा ओरेगॅनो
  • 1 लहान चमचा रे चीली फ्लेक्स
  • 1 लहान चमचा मिरपूड
  • अर्धी वाटी मोझरेला चीज
  • 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल

  ब्रेड पिझ्झा कप्स | How to make Bread Pizza Cups Recipe in Marathi

  1. गोलाकार बिस्किटाच्या कटरने सँडविच ब्रेडला गोलाकार कापून घ्या.
  2. ओवनला 190 अंश सेल्सियस तापमानावर प्रीहीट करा. मफिनच्या पॅनला ऑलिव्हचे तेल लावा आणि हळूहळू ब्रेडला गोलाकार ठेऊन अलगद दाबा.
  3. नंतर ब्रेडला एक पिझा सॉसचा थर लावा आणि चिरलेल्या भाज्या भरा.
  4. नंतर ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, मिरपूड आणि किसलेले मोझरेला चीज पेरा.
  5. आता तयार झालेल्या मफिनच्या पॅनला भाजण्यासाठी 10-15 मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा किंवा ब्रेड सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजा.
  6. मफिन पॅनमधून काळजीपूर्वक ब्रेड कप्स काढा आणि गरमागरम वाढा.

  Reviews for Bread Pizza Cups Recipe in Marathi (0)

  Cooked it ? Share your Photo