पाईन एप्पल कराची हलवा | Pine Apple Karachi Halwa Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  15th May 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Pine Apple Karachi Halwa recipe in Marathi,पाईन एप्पल कराची हलवा, Deepa Gad
पाईन एप्पल कराची हलवाby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  35

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

3

1

पाईन एप्पल कराची हलवा recipe

पाईन एप्पल कराची हलवा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pine Apple Karachi Halwa Recipe in Marathi )

 • कॉर्नफ्लोर १ वाटी
 • साखर २ वाटी
 • पाणी अडीज वाटी आणि २ वाटी
 • लिंबूरस १ चमचा
 • वेलचीपूड चिमूटभर
 • पाईन एप्पल क्रश २ चमचे
 • ड्रायफ्रूट आवडीनुसार
 • तूप ३-४ चमचे

पाईन एप्पल कराची हलवा | How to make Pine Apple Karachi Halwa Recipe in Marathi

 1. १ वाटी कॉर्नफ्लोअर एका भांड्यात घेऊन त्यात अडीज वाट्या पाणी घालून पेस्ट बनवा.
 2. नॉनस्टिक पॅनमध्ये २ वाटी साखर व २ वाटी पाणी घालून गॅसवर ठेवा
 3. साखर विरघळली की त्यात लिंबूरस व कॉर्नफ्लोरची पेस्ट घालून सतत ढवळत रहा
 4. मिश्रण दाट होत आलं की त्यात पाईन एप्पल क्रश घाला व १ चमचा तूप घाला
 5. तूप त्या मिश्रणात शोषून घेतलं की परत १ चमचा तूप घाला ढवळत रहा असं एकूण ३-४ चमचे तूप थोड्या थोडया वेळाने घालत रहा
 6. ड्रायफ्रूट चे तुकडे घाला, मिश्रण थोडंस डिशमध्ये घेऊन बघा हाताने त्याचा गोळा होत असेल तर तयार झालं असं समजावं
 7. डिशला तुपाचा हात लावून त्यात ते मिश्रण थापा वरून परत ड्रायफ्रूट घाला थंड झाल्यावर वड्या पाडा

My Tip:

हलवा करायला घ्यायच्या अगोदर ड्रायफ्रूट कपूर ठेवा तसच मिश्रण सतत ढवळत राहायचे नाहीतर गुठळ्या होतील

Reviews for Pine Apple Karachi Halwa Recipe in Marathi (1)

Sudha Kunkalienkar6 months ago

खूप छान
Reply

Cooked it ? Share your Photo