मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली वांगी

Photo of Bharli Vaangi by Deepa Gad at BetterButter
620
8
0.0(0)
0

भरली वांगी

May-15-2018
Deepa Gad
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली वांगी कृती बद्दल

प्रथम कांदा खोबरे यांचे भाजलेले वाटण करून घ्या त्या वाटणात शेंगदाण्याच कूट, मालवणी मसाला, मीठ घालून एकजीव करा. वांग्यांचा देठ कापून त्यांना चिरा द्या त्यात वाटलेलं वाटणाच मिश्रण भरा. कढईत तेल मोठे २ चमचे टाकून चिरलेला कांदा,टोमॅटो घालून चांगला मऊ होईपर्यंत शिजवा. आलं लसूण पेस्ट, मालवणी मसाला, कांदा-लसूण मसाला, धनेजिरे पावडर, मीठ टाकून चांगला परता. नंतर त्यात भरलेली वांगी घाला, बटाटे कापून घाला, राहिलेलं वाटण घालून झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवा. झाकणावर पाणी घाला, चिंचेचा कोळ घाला, शिजवा, कोथिंबीर पेरून सर्व्ह करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक

साहित्य सर्विंग: 4

  1. वांगी छोटी पाव किलो
  2. बटाटे छोटे २
  3. ओले खोबरे १ वाटी
  4. कांदा ४
  5. टोमॅटो १
  6. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट २-३ चमचे
  7. मालवणी मसाला २ चमचे
  8. कांदा लसूण मसाला १ चमचा
  9. धनेजिरे पावडर १ चमचा
  10. चिंचेचा कोळ २ चमचे
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. वाटणासाठी ओल खोबरं किसलेलं, कांदा उभा चिरलेला भाजून लालसर घ्या व मिक्सरमध्ये वाटा
  2. वाटणात मालवणी मसाला, शेंगदाण्याचे कूट, मीठ घालून एकजीव करा
  3. वांग्यांना चिरा पाडून घ्या त्यात वरील वाटणाचे मिश्रण भरा
  4. कढईत तेल चिरलेला कांदा, टोमॅटो घालून चांगलं मऊ होईपर्यंत शिजवा
  5. नंतर त्यात मालवणी मसाला, कांदा लसून मसाला, आलं लसूण पेस्ट, धनेजिरे पावडर, मीठ घालून चांगलं तेल सुटेपर्यंत परता
  6. भरलेली वांगी बटाटे तुकडे व राहिलेलं वाटण, थोडं पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा
  7. चिंचेचा कोळ घाला, शिजवा
  8. कोथिंबीर पेरा, सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर