भरवां लौकी पिवळ्या ग्रेव्ही मधे | Stuffed bottel gaurd in yellow grevy Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  15th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffed bottel gaurd in yellow grevy recipe in Marathi,भरवां लौकी पिवळ्या ग्रेव्ही मधे, जयश्री भवाळकर
भरवां लौकी पिवळ्या ग्रेव्ही मधेby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

भरवां लौकी पिवळ्या ग्रेव्ही मधे recipe

भरवां लौकी पिवळ्या ग्रेव्ही मधे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed bottel gaurd in yellow grevy Recipe in Marathi )

 • 250 ग्राम लौकी
 • 100 ग्राम पनीर क्रश केलेले
 • 1/2 चमचा काळी मिरी पावडर
 • 1/4 चमचा साखर
 • 1/4 चमचा मीठ
 • 2 चमचे तेल
 • 1 कांदा
 • 3-4 कळ्या लसणाच्या
 • 1 छोटा तुकडा अदरक
 • 2-3 टोमॅटो
 • 2-3 चमचे दही
 • 1/2चमचा हळद
 • 1चमचा काश्मीरी तिखट
 • 1चमचा धणे पावडर
 • 1/4 चमचा कसुरी मेथी
 • 1/4 चमचा साखर
 • 1 चमचा /चवीनुसार मीठ
 • कोथिंबीर सजावटी साठी

भरवां लौकी पिवळ्या ग्रेव्ही मधे | How to make Stuffed bottel gaurd in yellow grevy Recipe in Marathi

 1. लौकी चे गोल गोल तुकडे करून बिया वाला भाग काढून घ्या
 2. 2. हे राउंडल्स थोडं तेलात नरम शिजवून घ्या.
 3. पनीर क्रश करून त्यात काळी मिरी पावडर,मीठ, साखर घालून फिलिंग तयार करा.
 4. आता लौकी च्या बिया वाला नरम भाग आणि थोडे काजू, मगज करी,आणि तीळघ्या.
 5. मिक्सर मधून पेस्ट बनवून घ्या..
 6. कांदा, लसून अदरक आणि टोमॅटो चा मिक्सर मधून  पेस्ट तयार करा.
 7. एका पॅन मध्ये 2 चमचा तेल गरम करून त्यात पांढरा आणि लाल दोन्ही पेस्ट टाकून तेल सुटेल पर्यंत नीट परतून घ्या.
 8. .थोडी कसुरी मेथी हातानी क्रश करून घाला,साखर,आणि मीठ घालून मिक्स करा.
 9. आता ग्रेव्ही मध्ये दही नीट घुसळून मिक्स करा ही लाल ग्रेव्ही आता आम्हाला हवी तशी पिवळी ग्रेव्ही झाली.
 10. सर्व्हिंग प्लेट मध्ये ग्रेव्ही ,त्यात पनीर भरलेले लौकी चे राउंडल्स ठेवून कोथींबीर नी सजावट करून सर्व्ह करा.

My Tip:

लौकी मध्ये पनीर च्या ऐवजी चीझ ची फिलिंग पण करू शकता.

Reviews for Stuffed bottel gaurd in yellow grevy Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo