Photo of Batata Vada by Deepa Gad at BetterButter
1284
6
0.0(0)
0

बटाटा वडा

May-16-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा वडा कृती बद्दल

३ मोठे बटाटे उकडून घ्या, ते एक बाउल मध्ये घेऊन कुस्करा, फोडणीला तेलात मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची २ व लसूण पाकळ्या ४-५ यांची पेस्ट, हिंग चिमूट, हळद पाव चमचा, घालून ती फोडणी बटाट्यात घाला, कोथिंबीर ३ चमचे, लिंबूरस अर्धा चमचा, मीठ चवीनुसार घाला एकजीव करून त्याचे चपटे गोळे करून घ्या. एक बाऊलमध्ये १ वाटी बेसन, अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद, मीठ चवीनुसार, तेलाचं मोहन १ चमचा व आवश्यकतेनुसार पाणी घालून बॅटर बनवा. बटाट्याचे गोळे या बॅटर मध्ये घोळवून तेलात तळा. चटणीबरोबर सर्व्ह करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. बटाटे ३ मोठे
  2. मोहरी १ चमचा
  3. हिंग चिमूट
  4. हिरवी मिरची २
  5. लसूण पाकळ्या ४-५
  6. लिंबूरस अर्धा चमचा
  7. कढीपत्ता ७-८
  8. मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर ३ चमचे
  10. बेसन १ वाटी
  11. हळद पाव चमचा
  12. तिखट अर्धा चमचा
  13. तेलाचे मोहन १ चमचा
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. बटाटे उकडून साली काढून कुस्करून घ्या
  2. त्यात हिरवी मिरची लसूण पेस्ट,मोहरी, हिंग कढीपत्ता हळद यांची फोडणी, मीठ, कोथिंबीर घालून एकजीव करा
  3. त्याचे चपटे गोळे करून घ्या
  4. बेसनात हळद, तिखट , मीठ, तेलाचे मोहन घाला
  5. पाणी घालून बॅटर बनवा
  6. या बॅटर मध्ये बटाट्याचे गोळे घोळवून तेलात तळा
  7. चटणीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर