मुख्यपृष्ठ / पाककृती / इंस्टंट केशर मावा पेढा

Photo of Instant Kesar Mawa Pedha by Ajinkya Shende at BetterButter
789
4
0.0(0)
0

इंस्टंट केशर मावा पेढा

May-17-2018
Ajinkya Shende
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

इंस्टंट केशर मावा पेढा कृती बद्दल

मावा पेढा हा आपल्या सर्वांचा आवडता,परंतु पेढा घरी बनवायचा म्हणजे खुप वेळखाऊ काम..त्याला पर्याय म्हणून हा इंस्टंट केशर मावा पेढा आणि चवही तेवढीचं अप्रतिम..

रेसपी टैग

  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. २०० ग्रॅम जाडसर किसलेला खवा
  2. २ चमचे साजूक तूप
  3. मिल्क पावडर साधारण एक वाटी
  4. पाव वाटी दूध
  5. अर्धा तास गरम पाण्यात भिजवलेल्या १२-१५ केशराच्या काड्या
  6. पाव चमचा वेलची पावडर
  7. अर्धी वाटी साखर
  8. खाण्याचा पिवळा रंग(आवश्यक असल्यास)
  9. सजावटीसाठी बादामाचे काप

सूचना

  1. प्रथम एका पॅन मध्ये २ चमचे साजूक तूप टाकून तूप व्यवस्थित तापल्यावर त्यात किसलेला खवा टाकून खवा मध्यम आचेवर साधारण ४-५ मिनिट भाजून घ्यावा.
  2. नंतर त्यात मिल्क पावडर टाकून खवा पुन्हा २ मिनिट भाजून घ्या व भाजलेला खवा एका बाऊल मध्ये काढून ठेवा.
  3. नंतर एका पॅन मध्ये साखर,साखरेएवढचं पाणी व वेलची पावडर टाकून एकतारी पाकापेक्षा थोडा कमी घट्ट पाक तयार करून घ्यावा.
  4. पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेला खवा,पाण्यात भिजवलेली केशर व थोडा खाण्याचा पिवळा रंग टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व थंड झाल्यावर साधारण १० मिनिट फ्रिज मध्ये ठेवावे.
  5. नंतर खव्याच्या मिश्रणाचे हव्या त्या आकारात पेढे तयार करून घ्यावेत.
  6. तयार पेढे एका प्लेट मध्ये रचून वरून बादामाचे काप व केशराच्या काड्या ठेवून गार्निश करून घ्यावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर