कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / खीर कदम / रस कदम

Photo of Kheer Kadam / Ras Kadam by Sudha Kunkalienkar at BetterButter
547
2
0(0)
0

खीर कदम / रस कदम

May-17-2018
Sudha Kunkalienkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खीर कदम / रस कदम कृती बद्दल

हा रसगुल्ल्यापासून बनणारा अतिशय स्वादिष्ट आणि लोकप्रिय बंगाली पदार्थ आहे. रसगुल्ला फिक्या गोड माव्याच्या आवरणात भरला की त्याला खीर कदम म्हणतात. रसगुल्ले आणि मावा तयार असेल तर अगदी झटपट बनतो हा पदार्थ.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • वेस्ट  बंगाल
  • चिलिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रसगुल्ले ८-१०
  2. मावा पाव किलो
  3. पिठीसाखर २ मोठे चमचे
  4. बदामाची पावडर २ मोठे चमचे
  5. केशर २ चिमूट दुधात भिजवून

सूचना

  1. माव्यात केशर घालून मिक्स करा. मंद आचेवर गरम करून घ्या. गार झाल्यावर त्यात पिठीसाखर मिक्स करा.
  2. रसगुल्ले पाकातून काढून हलक्या हाताने दाबून जास्तीचा पाक काढून टाका.
  3. आता माव्याचे ८-१० गोळे करून घ्या.
  4. माव्याचा गोळ्याची पारी बनवून त्यावर रसगुल्ला ठेवा आणि हलक्या हाताने माव्याने रसगुल्ला कव्हर करा. छान गोळा बनवा आणि बदामाच्या पावडर मध्ये घोळवून घ्या.
  5. तयार झालेले खीर कदम फ्रिज मध्ये थंड करा.
  6. खायला द्यायच्या थोडा वेळ आधी फ्रीझ मधून बाहेर काढून ठेवा.
  7. स्वादिष्ट खीर कदम तुमची स्पेशल डिश म्हणून सर्व्ह करा. सगळ्यांना खूप आवडेल.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर