मार्बल केक | Tri Colour Marble Cake Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tri Colour Marble Cake recipe in Marathi,मार्बल केक, Deepa Gad
मार्बल केकby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  8

  माणसांसाठी

0

0

मार्बल केक recipe

मार्बल केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tri Colour Marble Cake Recipe in Marathi )

 • ७५ ग्राम बटर
 • १ कप कॅस्टर शुगर
 • २ अंडी
 • १ च बेकिंग पावडर
 • अर्धा च व्हॅनिला एस्सेन्स
 • १ कप मैदा
 • ४ च दूध
 • कोको पावडर २ च
 • रोझ सिरप २ च
 • पाईन एप्पल क्रश २ च

मार्बल केक | How to make Tri Colour Marble Cake Recipe in Marathi

 1. बाऊलमध्ये बटर, शुगर बीट करून घ्या, क्रीमी होईपर्यंत
 2. नंतर त्यात व्हॅनिला एस्सेन्स, अंडी फोडून घालून परत बीट करा
 3. मैदा, बेकिंग पावडर ३ वेळा चाळुून घ्या व हे मिश्रण वरील मिश्रणात घाला
 4. दूध घाला व चमच्याने एकाच बाजूने (कटफोल्ड) करून एकजीव करा
 5. या मिश्रणाचे ३ भाग करा ( ३ बाऊलमध्ये समान मिश्रण घ्या)
 6. एका मिश्रणात पाईन एप्पल क्रश, दुसऱ्या मिश्रणात रोझ सिरप, तिसऱ्या मिश्रणात कोको पावडर चाळून घाला
 7. प्रत्येक मिश्रण चमच्याने अलगद एकजीव करा
 8. केकटीनला ग्रीझ करून त्यात तुम्हाला हवे त्या क्रमाने एकावर एक मिश्रण घाला
 9. केकटिन अलगद आपटा म्हणजे (टॅप) करा
 10. केक तयार करायला घेताना सर्व साहित्य काढून ठेवा व मगच ओव्हन १८० डिग्री से ला प्रिहीट करून घ्या
 11. १८० डिग्री से ला ३० मिनिटे बेक करा

My Tip:

फ्लेवरसाठी तुम्ही रोझ सिरपच्या ऐवजी स्ट्रॉबेरी क्रश घालू शकता आणि पाईन एप्पल क्रश नसेल तर तसंच व्हाइट वापरू शकता.

Reviews for Tri Colour Marble Cake Recipe in Marathi (0)