मिसळ पाव | Misal Pav Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  18th May 2018  |  
4 from 1 review Rate It!
 • Misal Pav recipe in Marathi,मिसळ पाव, Deepa Gad
मिसळ पावby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

1

मिसळ पाव recipe

मिसळ पाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Misal Pav Recipe in Marathi )

 • मटकी २०० ग्राम
 • कांदा ३-४
 • टोमॅटो १
 • आलं- लसूण पेस्ट १ च
 • कांदा खोबऱ्याचे वाटण १ वाटी
 • कांदा लसूण मसाला १ ते दीड च
 • मालवणी मसाला १ च
 • धनेजिरे पावडर १ च
 • बटाटा उकडलेला १
 • कोथिंबीर सजावटीसाठी
 • फरसाण २ वाट्या
 • लिंबू २
 • पाव २ डझन

मिसळ पाव | How to make Misal Pav Recipe in Marathi

 1. मटकी रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी मोड येऊ द्या
 2. कुकरमध्ये मटकी व बटाटा शिजवून घ्यावे
 3. कांदा खोबरे भाजून त्यांचे वाटण करून घ्या
 4. कढईत तेल मोठे २ चमचे घाला त्यात कांदा व टोमॅटो चिरलेला घालून परता
 5. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, धनेजिरे पावडर घालून चांगलं परता
 6. पाणी, मीठ घालून चांगली उकळी आली की भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण घाला, बटाटा कुस्करून घाला व शिजवलेली मटकी घालून उकळी येऊ द्या
 7. सर्व्ह करताना डिशमध्ये ही मटकीची तर्री मटकीसाहित घ्या त्यावर फरसाण, चिरलेला कांदा, कोथिंबीर घाला, वरून लिंबू पिळा आणि पावाबरोबर सर्व्ह करा

My Tip:

मटकीच्या ऐवजी तुम्ही मूग, हिरवा किंवा सफेद वाटाणाही घेऊ शकता

Reviews for Misal Pav Recipe in Marathi (1)

tejswini dhopte6 months ago

Chan
Reply