कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Misal Pav

Photo of Misal Pav by Deepa Gad at BetterButter
5
3
4(1)
0

Misal Pav

May-18-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Misal Pav कृती बद्दल

कूकेरमध्ये मटकी, बटाटा शिजवून घ्या, भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण करून घ्या. कढईत तेल कांदा, टोमॅटो चिरून घाला. परतून आलं लसूण पेस्ट, सर्व मसाले घालून परता व पाणी घालून उकळी आली की त्यात वाटण घाला नंतर शिजवलेली मटकी, बटाटा, मीठ घालून शिजवा . सर्व्ह करताना डिशमध्ये मटकीसहित तर्री घेऊन त्यावर फरसाण, कांदा, कोथिंबीर घाला वरून लिंबू पिळा आणि पावाबरोबर सर्व्ह करा.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 5

 1. मटकी २०० ग्राम
 2. कांदा ३-४
 3. टोमॅटो १
 4. आलं- लसूण पेस्ट १ च
 5. कांदा खोबऱ्याचे वाटण १ वाटी
 6. कांदा लसूण मसाला १ ते दीड च
 7. मालवणी मसाला १ च
 8. धनेजिरे पावडर १ च
 9. बटाटा उकडलेला १
 10. कोथिंबीर सजावटीसाठी
 11. फरसाण २ वाट्या
 12. लिंबू २
 13. पाव २ डझन

सूचना

 1. मटकी रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी मोड येऊ द्या
 2. कुकरमध्ये मटकी व बटाटा शिजवून घ्यावे
 3. कांदा खोबरे भाजून त्यांचे वाटण करून घ्या
 4. कढईत तेल मोठे २ चमचे घाला त्यात कांदा व टोमॅटो चिरलेला घालून परता
 5. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, धनेजिरे पावडर घालून चांगलं परता
 6. पाणी, मीठ घालून चांगली उकळी आली की भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण घाला, बटाटा कुस्करून घाला व शिजवलेली मटकी घालून उकळी येऊ द्या
 7. सर्व्ह करताना डिशमध्ये ही मटकीची तर्री मटकीसाहित घ्या त्यावर फरसाण, चिरलेला कांदा, कोथिंबीर घाला, वरून लिंबू पिळा आणि पावाबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
May-19-2018
tejswini dhopte   May-19-2018

Chan

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर