कैरीचा कायरस | Kairicha Kayras - Raw Mango Sweet n Sour Pickle Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  18th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kairicha Kayras - Raw Mango Sweet n Sour Pickle recipe in Marathi,कैरीचा कायरस, Sudha Kunkalienkar
कैरीचा कायरसby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

0

0

कैरीचा कायरस recipe

कैरीचा कायरस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kairicha Kayras - Raw Mango Sweet n Sour Pickle Recipe in Marathi )

 • कैरीच्या फोडी  दीड  कप
 • चिरलेला गूळ दीड कप 
 • सुक्या लाल मिरच्या २ मध्ये चीर देऊन 
 • लाल तिखट अर्धा चमचा 
 • तेल १ मोठा चमचा 
 • मोहरी पाव चमचा 
 • हळद पाव चमचा 
 • हिंग ३-४ चिमूट
 • मेथी दाणे ८-१०
 • मीठ चवीनुसार 

कैरीचा कायरस | How to make Kairicha Kayras - Raw Mango Sweet n Sour Pickle Recipe in Marathi

 1. कैरी धुवून, सालं काढून मध्यम आकाराच्या फोडी करा. 
 2. एका पातेल्यात तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग, लाल मिरच्या आणि मेथी दाणे घालून खमंग फोडणी करा. 
 3. फोडणीत कैरीच्या फोडी घाला. मंद आचेवर झाकण ठेवून वाफवून घ्या. 
 4. कैरी जरा नरम झाली की फोडी बुडतील एवढं पाणी घाला आणि एक उकळी आणा. 
 5. त्यात गूळ, तिखट आणि मीठ घालून मंद आचेवर शिजवा. चवीप्रमाणे गूळ कमी/जास्त करा.  
 6. कैरी शिजली की गॅस बंद करा. 
 7. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून फ्रिज मध्ये ठेवा. कायरस एक आठवडा फ्रिज मध्ये राहतो
 8. पोळी, पराठा, ठेपला, भाकरी बरोबर हा आंबट गोड कायरस सर्व्ह करा. 

My Tip:

फोडणी  छान खमंग झाली पाहिजे

Reviews for Kairicha Kayras - Raw Mango Sweet n Sour Pickle Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo