मुख्यपृष्ठ / पाककृती / मँगो पास्ता

Photo of Mango Pasta by Aarti Nijapkar at BetterButter
977
8
0.0(0)
0

मँगो पास्ता

May-18-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मँगो पास्ता कृती बद्दल

मँगो पास्ता हि पाककृती माझी आहे म्हणजे माझ्या एका प्रसारण माध्यमात आंबा महोत्सव सुगरण प्रेक्षकांसाठी सादर करायची होती तर हा आंबा पास्ता बनविला होता आज आपण पाहूयात कसे बनवायचे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले पास्ता १ वाटी
  2. आंबा पेस्ट
  3. लसूण पाकळ्या २
  4. पांढरा कांदा चिरलेला १ लहान
  5. लाल जाडी मिरची चिरलेली १
  6. आंब्याचे तुकडे १ वाटी
  7. काळीमिरी १/२ लहान चमचा
  8. आंबा पास्ता
  9. आंबा पेस्ट
  10. फ्रेश क्रीम १/४ वाटी
  11. किसलेले चीझ १/४ वाटी
  12. लिंबाचा रस २ ते ३ थेंब
  13. काळीमिरी कुटलेली १/२ लहान चमचा
  14. आंबा कापलेले तुकडे १ वाटी
  15. तेल १ लहान चमचा
  16. मीठ चवीनुसार

सूचना

  1. प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला बारीक कांदा आणि कसून पाकळ्या थोडं लालसर होईपर्यंत परतवून घ्या
  2. मग लाल जाडी मिरची व कुटलेली काळीमिरी घालून व्यवस्थित परतवून घ्या नंतर त्यात आंब्याचे तुकडे घालून ते नरमसर होईपर्यंत परतवून घ्या व गॅस बंद करा आणि मिश्रण गार करून घ्या
  3. गार मिश्रण मिक्सर च्या भांड्यात घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या (गरजेनुसार पाणी घालावे)
  4. कढईमध्ये तेल गरम करून त्यात पेस्ट घालून परतवून घ्या (फार वेळ नाही) थोडे पाणी घाला
  5. आता चवीनुसार मीठ , फ्रेश क्रीम घालुन मिश्रम एकत्र करून घ्या
  6. आता त्यात चिरलेली लाल जाडी मिरची व काळीमिरी घालून त्यात पास्ता घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या
  7. आता वरून किसलेले चीझ व लिंबाचा रस घालून एकजीव करून घ्या शेवटी आंब्याचे तुकडे घालून एकत्र करून गॅस बंद करा
  8. गरमागरम आंबा पास्ता तयार आहे आवडीनुसार सजावट करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर