आंबा स्प्रिंग रोल | Mango Spring Roll Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  19th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Spring Roll recipe in Marathi,आंबा स्प्रिंग रोल, Aarti Nijapkar
आंबा स्प्रिंग रोलby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

5

0

आंबा स्प्रिंग रोल recipe

आंबा स्प्रिंग रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Spring Roll Recipe in Marathi )

 • सारण
 • आंबा कापलेला १ मोठा
 • तूप १ मोठा चमचा
 • ओलं खोबरे किसलेले १ कप
 • साखर १/२ कप
 • मावा २ मोठे चमचे
 • बडीशेप १ लहान चमचा
 • बदाम कापलेले १ लहान चमचा
 • काजू कापलेले १ लहान चमचा
 • पिस्ता कापलेले १ लहान चमचा
 • वेलची पावडर १/४ लहान चमचा
 • मीठ किंचित
 • तेल तळण्यासाठी
 • बाहेरच्या आवरणासाठी
 • मैदा १ वाटी
 • तेल १ चमचा
 • मीठ किंचित
 • पाणी गरजेनुसार

आंबा स्प्रिंग रोल | How to make Mango Spring Roll Recipe in Marathi

 1. एका कढई गरम करून त्यात तूप घाला मग किसलेले ओलं खोबरे व बडीशेप घालून व्यवस्थित मध्यम आचेवर भाजून घ्या मग मावा घालून एकत्र करून घ्या
 2. मग कापलेले बदाम , काजू , पिस्ते घालून परतवून घ्या वेलची पावडर घाला मंद आचेवर भाजा
 3. आता साखर घालून मिश्रण एकत्र करून घ्या
 4. मग कापलेले आंब्याचे फोड व मीठ घालून मध्यम आचेवर परतवून घ्या आंब्याच्या फोडी दाबून घ्या मिश्रण चांगले एकजीव करून घ्या व गॅस बंद करा
 5. हे मिश्रण गार करून घ्या
 6. आता बाहेरच्या आवरणासाठी कणिक मळून घेऊ
 7. मैदा , मीठ , तेल व गरजेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्या फार घट्ट व मऊसर मळू नये ५ मिनिटे ठेवून द्या
 8. गार झालेले मिश्रण घ्या 
 9. कणकेचे छोटे गोळे करून लाटून घ्या त्यात पुरेसे मिश्रण घाला व त्याचे रोल करून घ्या (मिश्रण भरल्यावर कोपरे दोन्ही बाजूने आतल्या बाजूला दुमडून मग दाबून रोल करा शेवटचा टोक व्यवस्थित बंद करा व थोड्या हलक्या बोटांनी रोल गोल लाटून घ्या)
 10. कढईत तेल घालून चांगले तापवून घ्या रोल तेलात घालून मध्यम आचेवर तळून घ्या दोन्ही बाजू सोनेरी होईपर्यंत तळून घ्या
 11. आता गरमागरम आंबा स्प्रिंग रोल तयार आहे  

My Tip:

ह्या सारणाचे उकडीचे मोदक बनवू शकता  आंबा मोदक रोल व्यवस्थित बंद होत नसेल तर कोपऱ्याला थोडे पाणी लावून दाबा व गोल फिरवू

Reviews for Mango Spring Roll Recipe in Marathi (0)