मँगो केक | Mango cake Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango cake recipe in Marathi,मँगो केक, Shilpa Deshmukh
मँगो केकby Shilpa Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मँगो केक recipe

मँगो केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango cake Recipe in Marathi )

 • मँगो पल्प 1 कप
 • मैदा 1 कप
 • कंडेन्स मिल्क 1/2 कप
 • पिठी साखर 1/2 कप
 • बटर 1/2 कप
 • बदाम क्रश 1 tbsp
 • काजू क्रश केलेले 1 tbsp
 • बेकिंग पावडर 1 tbsp
 • बेकिंग सोडा 1 tbsp
 • क्रीम चीज 50gr.
 • व्हिपिंग क्रीम 1/2 कप
 • पिठी साखर 1/3 tbsp
 • दूध 1/3 कप
 • मँगो इसेन्स 1 tbsp

मँगो केक | How to make Mango cake Recipe in Marathi

 1. मायक्रोवेह 180°वर प्रीहीट करा
 2. मँगो पल्प बटर आणि कंडेन्स मिल्क एका मिक्सिन्ग बाउल मध्ये घ्या आणि बिट करा
 3. मिश्रण एकजीव झालं की त्यामध्ये साखर घालून बिट करा तुम्ही इलेक्ट्रिक बिटर किंवा हॅन्ड बिटर काहीही वापरू शकता.
 4. मैदा ,सोडा ,बेकिंग पावडर चाळून घ्या आणि बिट केलेल्या मिश्रणात घाला ,एकदम टाकायचं नाही तीन वेळा थोडं थोडं टाकायचं आणि फेटून घ्यायच म्हणजे गुठळ्या होणार नाही.
 5. आता दूध आणि ड्रायफ्रूट टाकून परत फेटून घ्या
 6. इसेन्स घालून फेटून घ्या .इसेन्स प्लस कलर असेल तर उत्तम केकला रंगही छान येईल.
 7. केक टिन ला बटरने ग्रीसिंग करा तळाशी बटर पेपर ठेवा आणि आता मिश्रण टिन मध्ये समान टाका.
 8. एकदा खाली टॅप करा म्हणजे एअर निघून जाईल
 9. 25-30 मिनिट सेट करून केक बेक करा
 10. टूथपिक घालून चेक करा बेक झाला का जर टूथपिक ला काहीच चिपकलं नाही तर समजायचं बेक झाला
 11. दहा मिनिट थंड झाल्यावर टिन मधून अलगद काढा
 12. चीज ,व्हिपिंग क्रीम आणि साखर बिट करुन केकचे dresing करा
 13. आवडीच्य फळांनी ,जसं चेरी ,बेरीज ,स्ट्रॉबेरी नि गार्निश करा.

Reviews for Mango cake Recipe in Marathi (0)