काफरानु | Kafaranu Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  20th May 2018  |  
5 from 2 reviews Rate It!
 • Kafaranu recipe in Marathi,काफरानु, Rohini Rathi
काफरानुby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

2

काफरानु recipe

काफरानु बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kafaranu Recipe in Marathi )

 • तांदूळ बासमती एक कप
 • मीठ चवीनुसार
 • सलाडसाठी
 • लांब चिरलेली कोबी शिमला मिरची लाल व हिरवी एक कप
 • उकडलेले नूडल्स अर्धा कप
 • सोया सॉस एक टेबल स्पून
 • तेल 1 टेबल स्पून
 • लिंबूचा रस एक टीस्पून
 • करीसाठी
 • उकडलेल्या गाजर एक
 • बीट एक
 • टोमॅटो 2
 • काळीमिरी पूड एक टी स्पून
 • गरम मसाला 1 टी स्पून
 • लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
 • धने पावडर 1 टिस्पून
 • आले-लसणाची पेस्ट एक टिस्पून
 • मीठ चवीनुसार
 • तळलेला कांदा एक कप

काफरानु | How to make Kafaranu Recipe in Marathi

 1. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कोबी सिमला मिरची वाफवलेले नूडल्स मीठ सोयासॉस लिंबाचा रस काळीमिरी पूड घालून सारण तयार करून घ्यावे
 2. भात स्वच्छ धुऊन शिजवून घ्यावा
 3. नंतर करी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मध्ये उकडलेल्या गाजर बीट टोमॅटो आणि पाणी घालून मिक्सरमधून सर्व वाटून घ्यावे
 4. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आले-लसणाची पेस्ट माझ्याच वाटण धणे पूड काळीमिरी पूड गरम मसाला लाल मिरची आणि मीठ घालून मिश्रणाला एक उकळी काढून नंतर त्यामध्ये तयार भात घालावा
 5. बेकिंग ट्रे घेऊन त्यात तेल लावून त्यामध्ये तळलेला कांदा नंतर करी भात त्यावर तयार पांढरा भात आणि पुन्हा त्यावर ग्रेव्ही भात घालून त्यांचे थर बनवून घ्यावेत
 6. सर्व्हिंग प्लेटमध्ये भात काढून सलाड सजावट करून सर्व करावा

My Tip:

सलाडमध्ये व्हिनेगार घालू शकता

Reviews for Kafaranu Recipe in Marathi (2)

Pranali Deshmukh6 months ago

मस्त
Reply
Rohini Rathi
6 months ago
thank you

Maya Joshi6 months ago

Superb,
Reply
Rohini Rathi
6 months ago
thanks

Cooked it ? Share your Photo