टोमॅटोचे लोणचे | Tomato pickle Recipe in Marathi

प्रेषक Renu Kulkarni  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tomato pickle recipe in Marathi,टोमॅटोचे लोणचे, Renu Kulkarni
टोमॅटोचे लोणचेby Renu Kulkarni
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

14

0

टोमॅटोचे लोणचे recipe

टोमॅटोचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tomato pickle Recipe in Marathi )

 • टमाटे 6
 • लसूण पाकळी 20
 • मोहरी 1 tsp
 • मेथी दाणे 1/4 tsp
 • लाल तिखट 3 tsp
 • चिंच छोट्या लिंबाएवढि
 • गूळ 1 tsp
 • तेल 3 tablespoon
 • मीठ 2 tsp

टोमॅटोचे लोणचे | How to make Tomato pickle Recipe in Marathi

 1. टमाटे स्वच्छ करून चिरून घ्या.
 2. लसूण सोलून घ्या.
 3. तेल कढईत तापवा व त्यात लसूण घालून घया.
 4. 2 मिनिटांनी टमाटे घाला,परता, व झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्ये.
 5. मोहरी व मेथी भाजून पूड करा.
 6. चिंच भिजवून व 1/2 वाटी पाणी घालून कोळ करा.
 7. लाल तिखट,मोहरी व मेथी भरड , चिंच कोळ व गूळ एकत्र करा.
 8. 10 मिनिटांनी टमाटे मिक्स मध्ये वरील मिश्रण घाला.
 9. मीठ पण घाला.मध्ये मध्ये हलवत राहा.
 10. तेल सुटे पर्यंत शिजवा.
 11. आपले चटकदार लोणचे तयार.

My Tip:

फ्रिज मध्ये ठेवा, जास्त दिवस टिकेल.

Reviews for Tomato pickle Recipe in Marathi (0)