मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही ड्राय फ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी

Photo of Shahi dry fruit momos with kesariya rabdi by Ajinkya Shende at BetterButter
1049
6
0.0(0)
0

शाही ड्राय फ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी

May-20-2018
Ajinkya Shende
35 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही ड्राय फ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी कृती बद्दल

मोमोज हा पदार्थ भाज्यांचे किंवा चिकन चं सारण भरून व मैद्याची पारी वापरून बनवला जातो,परंतु पिवळ्या रंगाचे पदार्थ ह्या थीमसाठी केशराचा वापर करून हा शाही ड्राय फ्रुट मोमोज हा मोमोज चा वेगळा प्रकार बनवण्याचा प्रयत्न..

रेसपी टैग

  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मोमोजसाठी-
  2. एक वाटी जाडसर कुटलेला सुका मेवा(अक्रोड,काजू, बदाम,गोडंबी,मनुका)
  3. २-३ चमचे गुलकंद
  4. ४ खजुराचे बारीक काप
  5. पाव चमचा वेलची पावडर
  6. दीड वाटी मैदा
  7. पाऊण वाटी मिल्क पावडर
  8. २ चमचे साजूक तूप
  9. गरम दुधात भिजवलेल्या १२-१५ केशराच्या काड्या
  10. पाव वाटी कंडेंस्ड मिल्क
  11. आवश्यकतेनुसार दूध
  12. थोडासा खाण्याचा पिवळा रंग
  13. केशर रबडीसाठी-
  14. दोन वाटी फुल क्रीम दुध
  15. पाऊण वाटी कंडेंस्ड मिल्क
  16. गरम दुधात भिजवलेल्या १०-१२ केशराच्या काड्या
  17. पाव चमचा वेलची पावडर
  18. सजावटीसाठी सुकामेवा

सूचना

  1. प्रथम एका बाऊलमध्ये मैदा,मिल्क पावडर,कंडेन्स्ड मिल्क,केशर भिजवलेलं दूध,तूप हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यात आवश्यकतेनुसार दूध व आवश्यकता असल्यास थोडा खाण्याचा पिवळा रंग टाकून मैदा मऊसर भिजवून घेणे साधारण अर्धा तास मुरण्यासाठी झाकून ठेवणे.
  2. तोपर्यंत एका बाऊलमध्ये सारणासाठी सुका मेवा,गुलकंद,खजुराचे काप व वेलची पावडर एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेणे.
  3. नंतर रबडी बनवण्यासाठी एका पसरट पॅन मध्ये दूध उकळत ठेवणे.
  4. दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क,वेलची पावडर,दुधात भिजवलेली केशर टाकून दूध घट्ट होईपर्यंत उकळू द्यावे.(दूध उकळत असताना मध्ये मध्ये चाळवत रहावे)
  5. तयार रबडी रूम टेम्प्रेचर ला आल्यावर थोडा वेळ फ्रीज मध्ये थंड करण्यासाठी ठेवावी.
  6. नंतर भिजवलेल्या मैद्याची पुरी लाटून त्यात सारण भरून हव्या त्या आकाराचे मोमोज बनवून घेणे.
  7. नंतर एका पातेलीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेऊन पाणी उकळत ठेवावे.
  8. पाणी उकळल्यावर एका चाळणीला तुपाने ग्रीसिंग करून त्यात मोमोज रचून ती चाळणी पातेलीवर ठेवून वरून झाकण ठेवून मोमोज उकडीच्या मोदकाप्रमाणे १०-१२ मिनिट वाफवून घेणे.
  9. तयार मोमोज रूम टेम्प्रेचर ला आल्यावर १०-१५ मिनिट फ्रिज मध्ये ठेवून हलकेसे थंड करून घेणे.
  10. नंतर ते मोमोज सर्विंग प्लेट मध्ये रचून सुक्या मेव्याने गार्निश करून घ्यावे व केशर रबडीसोबत सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर