व्हेज तांबडा रस्सा | Veg.Tambada Rassa Recipe in Marathi

प्रेषक Ajinkya Shende  |  20th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg.Tambada Rassa recipe in Marathi,व्हेज तांबडा रस्सा, Ajinkya Shende
व्हेज तांबडा रस्साby Ajinkya Shende
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

व्हेज तांबडा रस्सा recipe

व्हेज तांबडा रस्सा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg.Tambada Rassa Recipe in Marathi )

 • १ बारीक कापलेला लहान कांदा
 • ३ चमचे कीसलेलं सुकं खोबरं
 • अर्धा इंच आल्याचा तुकडा
 • ५-६ लसूण पाकळ्या
 • खडा मसाला(१ मसाला वेलची,२ हिरव्या वेलची, छोटा दालचिनीचा तुकडा,३-४ काळी मिरी,३-४ लवंगा)
 • एका लहान कांद्याच्या मोठ्या चौकोनी आकारात कापलेल्या फोडी
 • एका लहान बटाट्याच्या मध्यम चौकोनी आकारात कापलेल्या फोडी
 • एका लहान टोमॅटोच्या मोठ्या चौकोनी आकारात कापलेल्या फोडी
 • सिमला मिरचीच्या मोठ्या चौकोनी आकारात कापलेल्या ५-६ फोडी
 • फ्लॉवर चे ५-६ मोठे तुकडे
 • पाव वाटी ताजे हिरवे वाटणे
 • पाव वाटी हव्या त्या आकारात कापलेली फरसबी
 • बारीक कापलेली ५-६ कढीपत्त्याची पानं
 • पाव वाटी तेल
 • अर्धा चमचा जीरं
 • पाव चमचा साखर
 • २ चमचे कांदा-लसूण मसाला
 • १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
 • अर्धा चमचा धणा जीरा पावडर
 • पाव चमचा हळद
 • चवीप्रमाणे मीठ
 • बारीक कापलेली कोथिंबीर

व्हेज तांबडा रस्सा | How to make Veg.Tambada Rassa Recipe in Marathi

 1. प्रथम सुकं खोबरं व सर्व खडा मसाला थोडा भाजून ५ मिनिट गरम पाण्यात भिजवून ठेवावा.
 2. नंतर बारीक कापलेला कांदा,लसूण,आलं व पाण्यात भिजवलेलं सुकं खोबरं व खडा मसाला ह्याची मिक्सर मध्ये स्मूथ मसाला पेस्ट बनवून घ्यावी.
 3. नंतर एका पॅन मध्ये साधारण दीड ग्लास पाणी टाकून पाणी उकळल्यावर त्यात बटाटा,वाटाणे,फरसबी,फ्लॉवर,किसलेलं आलं आणि बारीक कापलेला कढीपत्ता टाकून हे पाणी साधारण १० मिनिट उकळवून घ्यावं.
 4. तोपर्यंत एका कढईत पाव वाटी तेल टाकून तेल तापल्यावर त्यात जीरं,साखर व कांदा, टोमॅटो,सिमला मिरची टाकून थोडं परतवून घ्यावे.
 5. नंतर त्यात मसाला पेस्ट टाकून साधारण २-३ मिनिट परतवून त्यात सर्व मसाले टाकून ही पेस्ट तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावी.
 6. नंतर त्यात उकळत ठेवलेल्या भाज्या पाण्यासकट टाकाव्या व त्यात आवश्यकतेनुसार मीठ,कोथिंबीर टाकून रस्सा साधारण ८-१० मिनिट उकळवून घेणे.
 7. तयार रस्सा सर्विंग प्लेट मध्ये काढून वरून कोथिंबीर टाकून गार्निश करून घेणे व ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणे.

My Tip:

तुम्ही ह्यात तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता.

Reviews for Veg.Tambada Rassa Recipe in Marathi (0)