मुख्यपृष्ठ / पाककृती / खांदेशी डाळ-शेंगदाण्याचं बट्ट(आमटी)

Photo of Khandeshi dal-shengdanyach batt(aamti) by Ajinkya Shende at BetterButter
735
4
0.0(0)
0

खांदेशी डाळ-शेंगदाण्याचं बट्ट(आमटी)

May-20-2018
Ajinkya Shende
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खांदेशी डाळ-शेंगदाण्याचं बट्ट(आमटी) कृती बद्दल

हा चवदार चविष्ट पदार्थ खान्देशचा पारंपरिक पदार्थ आहे,ही आमटी भाकरी व भातासोबत खाल्ली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव वाटी शेंगदाणे
  2. पाव वाटी चण्याची डाळ
  3. ३-४ हिरव्या मिरच्या
  4. एक इंच आल्याचा तुकडा
  5. जीरं
  6. बारीक कापलेला कढीपत्ता
  7. तेल
  8. पाव चमचा हळद
  9. अर्धा चमचा धणा-जीरा पावडर
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. कोथिंबीर

सूचना

  1. प्रथम एका कढईत शेंगदाणे भाजून घेणे.
  2. नंतर त्याचं कढईत १ चमचा तेल टाकून चणा डाळ लालसर होईपर्यंत भाजून घेणे.
  3. नंतर मिक्सर मध्ये शेंगदाणे, चणाडाळ,जीरं,मिरची आणि आलं व थोडं पाणी टाकून ह्याची स्मूथ पेस्ट बनवून घेणे.
  4. नंतर एका कढईत ३-४ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात बारीक कापलेला कढीपत्ता,जीरं व शेंगदाणा-चणाडाळीची पेस्ट टाकून २-३ मिनिट परतवून घ्यावं.
  5. नंतर त्यात धणा-जीरा पावडर व हळद टाकून पुन्हा २-३ मिनिट परतवून त्यात आवश्यकतेनुसार पाणी(साधारण दीड ते दोन ग्लास),चवीप्रमाणे मीठ व कोथिंबीर टाकून आमटी मध्यम आचेवर १०-१२ मिनिट उकळवून घ्यावी.
  6. तयार आमटी कुठलीही भाकरी व भातासोबत सर्व करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर