Photo of Puran Poli by Sakshi Khanna at BetterButter
16198
200
4.4(0)
0

पुरण पोळी

Aug-06-2015
Sakshi Khanna
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरण पोळी कृती बद्दल

पुरण पोळी हा सपाट ब्रेडसारखा भारतीय गोड पदार्थ आहे. महाराष्ट्राच्या पुरण पोळीमध्ये हरभरा डाळ तर गुजरातमध्ये तूरडाळ वापरली जाते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 कप गुळाची पावडर
  2. 1 कप हरभरा डाळ ( तुकडे केलेला आणि साली काढलेला हरभरा )
  3. 1.5 कप गव्हाचा आटा
  4. 1/2 कप मैदा
  5. 3 टी स्पून तूप
  6. 1 टी स्पून बडीशेप पावडर
  7. 2 टी स्पून सुंठ पावडर
  8. 1/2 टी स्पून वेलदोडा पावडर
  9. 1 टी स्पून जायफळ पावडर
  10. 1 टी स्पून हळद पावडर
  11. पाणी
  12. चवीनुसार मीठ

सूचना

  1. हरभरा डाळ 30 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावी .
  2. 5-6 शिट्ट्या होईपर्यंत हरभरा डाळ प्रेशर कुकर मध्ये शिजवावी . गाळून घ्यावी आणि बाजूला ठेवावी.
  3. पॅनमध्ये तूप गरम करावे, त्यात सुंठ पावडर,जायफळ पावडर,वेलदोडा पावडर आणि बडीशेप पावडर घालावी . काही सेकंद परतावे.
  4. मिश्रणामध्ये हरभरा डाळ आणि गूळ घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजवावे.
  5. मिश्रण थंड होऊ द्या. नंतर मिश्रणाचा चांगला लगदा करून घ्यावा .
  6. पोळीच्या कणकेसाठी : एका बाऊलमध्ये आटा ( गव्हाचे पीठ ), मैदा ( शुद्ध पीठ ) आणि मीठ मिसळावे.
  7. त्यामध्ये थोडेसे तूप आणि पाणी घालून गुळगुळीत व मऊ कणीक मळावी. ती एका कापडात 15-20 मिनिटे झाकून ठेवावी.
  8. कणकेचे मध्यम आकाराचे गोळे बनवावेत आणि लाटण्याने पोळी लाटावी.
  9. त्यामध्ये तयार मिश्रण ठेवावे आणि कडा एकत्र करणे आणि त्या बोटाने दाबणे.
  10. पोळपाटावर थोडे पीठ पसरावे आणि कणकेचा गोळा गोल आकारात लाटावा.
  11. गरम तव्यावर तूप टाकून तो तेलकट करावा आणि पोळी तव्यावर टाकावी.
  12. पोळीवर तूप घालून ती एका बाजूने शिजल्यावर पलटावी.
  13. दोन्ही बाजूंनी शिजवावे आणि दह्या बरोबर खायला द्यावी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर