दिलखुश टूटी फ्रूटी पराठा | Dilkhush Tutifruty Paratha Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  24th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Dilkhush Tutifruty Paratha recipe in Marathi,दिलखुश टूटी फ्रूटी पराठा, Vaishali Joshi
दिलखुश टूटी फ्रूटी पराठाby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

दिलखुश टूटी फ्रूटी पराठा recipe

दिलखुश टूटी फ्रूटी पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dilkhush Tutifruty Paratha Recipe in Marathi )

 • पारी साठी -१/२ कप कणिक
 • १/२ कप मैदा
 • २ चमचे रवा
 • २ चमचे तेलाचे मोहन
 • चिमुटभर मीठ
 • सारणा साठी - १/२ कप खोबर किस
 • १/२ कप पीठी साखर
 • २ चमचे ड्राय फ्रूट्स अगदी बारीक़ तुकडे करुन
 • १/२ चमचा वेलची पावडर
 • १/२ कप वेगवेगळ्य़ा कलर्स ची टूटी फ्रूटी
 • साजुक तूप

दिलखुश टूटी फ्रूटी पराठा | How to make Dilkhush Tutifruty Paratha Recipe in Marathi

 1. कणिक , मैदा , रवा एकत्र करून त्या मध्ये मोहन आणि मीठ घालून पीठ मळून थोडा वेळ झाकून ठेवा
 2. आता सारण करू -खोब्रा किस (डेसीकेटेड ) पीठी साखर , ड्राय फ्रूट्स , वेलची पावडर आणि टूटी फ्रूटी टाकुन एकत्र करा
 3. मळलेल्या पिठाची पारी करुन त्यात तयार सारण भरून हलक्या हातानी लाटून घ्या
 4. गरम तव्या वर साजुक तूप घालून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या
 5. गरमा गरम किंवा थंड करून खाऊ शकता

My Tip:

खोबरा किस डेसिकेटेड नसेल तर खवलेला नारळ घेउ शकतो पण त्याला थोड कढईत परतून घेउन म्हणजे त्याचा ओलसरपणा जाइल

Reviews for Dilkhush Tutifruty Paratha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती