मिरची वडा - राजस्थानी स्पेशल | Mirchi Vada - Fried Stuffed Chilly Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  25th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mirchi Vada - Fried Stuffed Chilly recipe in Marathi,मिरची वडा - राजस्थानी स्पेशल, Sudha Kunkalienkar
मिरची वडा - राजस्थानी स्पेशलby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

मिरची वडा - राजस्थानी स्पेशल recipe

मिरची वडा - राजस्थानी स्पेशल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mirchi Vada - Fried Stuffed Chilly Recipe in Marathi )

 • भावनगरी मिरच्या ८-१०
 • उकडलेले बटाटे ६-७ मध्यम 
 • लाल तिखट अर्धा चमचा 
 • जिरे पूड अर्धा चमचा 
 • धने पूड अर्धा चमचा 
 • हळद  अर्धा चमचा 
 • आमचूर  अर्धा चमचा 
 • चिरलेली कोथिंबीर १ चमचा
 • मीठ चवीनुसार 
 • तेल २ चमचे आणि तळण्याकरता 
 • बाहेरील आवरणासाठी 
 • बेसन ६ मोठे चमचे 
 • तांदूळ पीठ २ मोठे चमचे 
 • लाल तिखट पाव  चमचा
 • हळद  पाव  चमचा
 • ओवा पाव  चमचा
 • हिंग २ चिमूट 
 • मीठ चवीनुसार 

मिरची वडा - राजस्थानी स्पेशल | How to make Mirchi Vada - Fried Stuffed Chilly Recipe in Marathi

 1. मिरच्या धुवून सुकवून घ्या. देठं काढू नका. प्रत्येक मिरचीला एका बाजूने उभी चीर द्या. पूर्ण कापू नका. 
 2. हलक्या हाताने मिरचीच्या शीरा आणि बिया काढून टाका. हे करताना शक्यतो हातात ग्लोव्हज किंवा प्लास्टिक पिशवी घाला. नाहीतर नंतर हाताची आग होईल. 
 3. बटाटे साले काढून कुस्करून घ्या.  
 4. एका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात हळद घाला. बटाट्याचा कुस्करा, लाल तिखट, धने, जिरे पूड, आमचूर, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा. चांगले मिक्स झाले की मिश्रण एका ताटलीत काढून गार करायला ठेवा. 
 5. हे मिश्रण प्रत्येक मिरचीमध्ये भरा. मिरची तुटू देऊ नका.  
 6. बाहेरील आवरणासाठी एका बाउल मध्ये बेसन आणि बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. पाणी घालून जाडसर पीठ भिजवून घ्या. नेहमीच्या भज्यांच्या पिठापेक्षा जाड हवे. 
 7. एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करा. २ चमचे कडकडीत तेल बेसनाच्या पिठात घालून मिक्स करा.  
 8. आता मिरची ह्या बेसनाच्या पिठात बुडवून तेलात सोडा. आणि खमंग तळून घ्या. 
 9. गरमागरम मिरची वडा वर चाट मसाला भुरभुरवून खायला द्या.  

Reviews for Mirchi Vada - Fried Stuffed Chilly Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo