BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मिरची वडा - राजस्थानी स्पेशल

Photo of Mirchi Vada - Fried Stuffed Chilly by Sudha Kunkalienkar at BetterButter
0
2
0(0)
0

मिरची वडा - राजस्थानी स्पेशल

May-25-2018
Sudha Kunkalienkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिरची वडा - राजस्थानी स्पेशल कृती बद्दल

भावनगरी मिरची मध्ये उकडलेल्या बटाट्याचे सारण भरून मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून तळतात. भावनगरी मिरच्या कमी तिखट असतात आणि बटाट्याच्या सारणामुळे तिखटपणा आणखी कमी होतो. खूप चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता पावसाचे वेध लागलेच आहेत. बाहेर छान पाऊस पडत असताना गरम गरम मिरची वडे आणि चहाचा बेत नक्कीच करा ह्या पावसाळ्यात.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • राजस्थान
 • फ्रायिंग
 • सौटेइंग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 3

 1. भावनगरी मिरच्या ८-१०
 2. उकडलेले बटाटे ६-७ मध्यम 
 3. लाल तिखट अर्धा चमचा 
 4. जिरे पूड अर्धा चमचा 
 5. धने पूड अर्धा चमचा 
 6. हळद  अर्धा चमचा 
 7. आमचूर  अर्धा चमचा 
 8. चिरलेली कोथिंबीर १ चमचा
 9. मीठ चवीनुसार 
 10. तेल २ चमचे आणि तळण्याकरता 
 11. बाहेरील आवरणासाठी 
 12. बेसन ६ मोठे चमचे 
 13. तांदूळ पीठ २ मोठे चमचे 
 14. लाल तिखट पाव  चमचा
 15. हळद  पाव  चमचा
 16. ओवा पाव  चमचा
 17. हिंग २ चिमूट 
 18. मीठ चवीनुसार 

सूचना

 1. मिरच्या धुवून सुकवून घ्या. देठं काढू नका. प्रत्येक मिरचीला एका बाजूने उभी चीर द्या. पूर्ण कापू नका. 
 2. हलक्या हाताने मिरचीच्या शीरा आणि बिया काढून टाका. हे करताना शक्यतो हातात ग्लोव्हज किंवा प्लास्टिक पिशवी घाला. नाहीतर नंतर हाताची आग होईल. 
 3. बटाटे साले काढून कुस्करून घ्या.  
 4. एका कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात हळद घाला. बटाट्याचा कुस्करा, लाल तिखट, धने, जिरे पूड, आमचूर, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करा. चांगले मिक्स झाले की मिश्रण एका ताटलीत काढून गार करायला ठेवा. 
 5. हे मिश्रण प्रत्येक मिरचीमध्ये भरा. मिरची तुटू देऊ नका.  
 6. बाहेरील आवरणासाठी एका बाउल मध्ये बेसन आणि बाकी सर्व पदार्थ एकत्र करा. पाणी घालून जाडसर पीठ भिजवून घ्या. नेहमीच्या भज्यांच्या पिठापेक्षा जाड हवे. 
 7. एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करा. २ चमचे कडकडीत तेल बेसनाच्या पिठात घालून मिक्स करा.  
 8. आता मिरची ह्या बेसनाच्या पिठात बुडवून तेलात सोडा. आणि खमंग तळून घ्या. 
 9. गरमागरम मिरची वडा वर चाट मसाला भुरभुरवून खायला द्या.  

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर