ओले वाटाणे बटाटे | Geele Matar Aloo Recipe in Marathi

प्रेषक BetterButter Editorial  |  7th Aug 2015  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Geele Matar Aloo by BetterButter Editorial at BetterButter
ओले वाटाणे बटाटे by BetterButter Editorial
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1198

0

ओले वाटाणे बटाटे recipe

ओले वाटाणे बटाटे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Geele Matar Aloo Recipe in Marathi )

 • 4 मोठे बटाटे
 • 1 वाटी ताजे किंवा फ्रोजन वाटाणे
 • 2 बारीक चिरलेले कांदे
 • 1 लहान चमचा आले-लसणाची पेस्ट
 • 2 बारीक चिरलेले टोमॅटो
 • अर्धा लहान चमचा जिरेपूड
 • अर्धा लहान चमचा धणेपूड
 • 1/4 लहान चमचा हळद
 • अर्धा लहान चमचा लाल तिखट
 • मीठ स्वादानुसार
 • अर्धा लहान चमचा साखर
 • 1 कप पाणी
 • 1 लहान चमचा जिरे
 • 1 लहान चमचा तेल
 • सजविण्यासाठी कोथिंबीर
 • गरम मसाला पावडर

ओले वाटाणे बटाटे | How to make Geele Matar Aloo Recipe in Marathi

 1. 1. बटाटे धुवा आणि सोलून त्याचे मोठे तुकडे करा. पाण्यात भिजवा आणि काढून बाजूला ठेवा.
 2. एक पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात जिरे घालून तडतडू द्या. नंतर आले-लसणाची पेस्ट आणि चिरलेला कांदा घालून 3-4 मिनिटे शिजवा.
 3. त्यात टोमॅटो घाला आणि नंतर त्यात जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट, हळद, मीठ आणि साखर घालून नीट मिसळा आणि 8-10 मिनिटे किंवा तेल कडा सोडेपर्यंत शिजवा.
 4. आता त्यात बटाटे आणि टोमॅटो घाला. पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या. मंद आचेवर बटाटे नरम होईपर्यंत शिजवा.
 5. 5. शिजल्यानंतर सुध्दा पाणी दिसले, तर पाणी संपेपर्यंत शिजवा. यामुळे तुम्हाला घट्ट रसा मिळेल जी बटाट्यांना पूर्णपणे चिकटलेली असेल.
 6. चव वाढविण्यासाठी आच बंद केल्यानंतर वरून गरम मसाला घाला आणि कोथिंबीरीने सजवून गरमगरम वाढा.

My Tip:

या मेनूत तुम्ही कॉटेज चीजचे तुकडे सुध्दा घालू शकतात.

Reviews for Geele Matar Aloo Recipe in Marathi (0)