रायवळ आंबा सार | Mango sar Recipe in Marathi

प्रेषक Deepasha Pendurkar  |  27th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango sar recipe in Marathi,रायवळ आंबा सार, Deepasha Pendurkar
रायवळ आंबा सारby Deepasha Pendurkar
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

रायवळ आंबा सार recipe

रायवळ आंबा सार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango sar Recipe in Marathi )

 • सहा रायवळ आंबे
 • अर्धा मोठा वाटी ओले नारळाची
 • 5 चमचे धने
 • 2 चमचे उडीद डाळ
 • 2 बेडगी मिरच्या 6 सुख्या चपटा तिखट मिरच्या
 • राय कडीपत्ता 2 लाल मिरच्या फोडणी साठी
 • मीठ
 • 1 छोटा गुळाचा खडा
 • तेल
 • हळद

रायवळ आंबा सार | How to make Mango sar Recipe in Marathi

 1. रायवळ आंब्याच्या साली कडून घ्या
 2. काढलेल्या साली पाण्यामध्ये चांगल्या पिळून घ्या साली टाकून द्या आणि हे पाणी वापरासाठी ठेवा
 3. आंबे आणि काढलेले पाणी दोनी मिक्स करून उकडण्या साठी ठेवा
 4. त्यामध्ये चवीपुरते मीठ हळद गुल घाला आणि उकळी येण्या साठी ठेवा
 5. याप्रकारे उकळी येऊ दे
 6. नंतर उडीद डाळ मिरच्या धने भाजून घ्या
 7. आता किसलेलं खोबरे गुलाबी होई पर्यंत भाजून घ्या
 8. आता सर्व भाजलेले जिन्नस पाणी घालून बारीक वाटून घ्या
 9. आता तयार मसाला आंब्या मध्ये घाला
 10. 1 वाटी पाणी घाला आणि उकळी येऊ द्या
 11. राई कडीपत्ता मिरच्यांचा फोडणी करून वरून घाला
 12. गॅस बंद करा
 13. थोडा वेळ झाकून ठेवा आणि खाण्या साठी तयार

My Tip:

सर थोडे घट्टच करा पातळ चांगले लागत नाही आणि आंबा रायवळ च घ्या

Reviews for Mango sar Recipe in Marathi (0)