Home / Recipes / Purple Yam and Black Grapes Icecream

Photo of Purple Yam and Black Grapes Icecream by Nayana Palav at BetterButter
2129
14
0.0(0)
0

Purple Yam and Black Grapes Icecream

Jan-22-2018
Nayana Palav
30 minutes
Prep Time
600 minutes
Cook Time
10 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Purple Yam and Black Grapes Icecream RECIPE

कोनफळ फक्त हिवाळयातच मिळते. आपण याची भाजी करतो किंवा उपवासाला याचे चिप्स खातो. लहान मुले तर कोनफळ खात नाही. मग काय करावे बरे, म्हणून मी याचे आईसक्रीम बनवले. द्राक्षाचा हंगाम आहे म्हणून यात द्राक्षं घातली, ही रेसिपी माझे संशोधन आहे. जांभळया रंगाचे चविष्ट आईसक्रीम तयार झाले. कोणाला कळले पण नाही की यात कोनफळ आहे. हे तुम्ही सहज घरी बनवू शकता. चला तर पाहू याची रेसिपी.

Recipe Tags

  • Veg
  • Medium
  • Everyday
  • Fusion
  • Freezing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 10

  1. दूध १/२ लिटर
  2. १० टेबलस्पून साखर
  3. १/२ कप फ्रेश क्रीम
  4. कोनफळ १ छोटे
  5. १ टेबलस्पून साखर सिरप साठी
  6. मिल्क पावडर ३ टेबलस्पून
  7. कॉर्नफ्लावर १,१/२ टेबलस्पून
  8. जीएमएस पावडर १,१/२ टेबलस्पून
  9. सीएमएस पावडर १/८ टेबलस्पून
  10. काळी द्राक्ष २०० ग्राम
  11. कॉर्नफ्लावर १ टेबलस्पून सिरप साठी
  12. काळे मनुके २ टेबलस्पून

Instructions

  1. अर्धा लिटर दूधातले १ कप दूध बाजूला काढून ठेवा.
  2. बाकीचे दूध गरम करत ठेवा.
  3. १ कप दूधात ३ टेबलस्पून मिल्क पावडर, कॉर्नफ्लावर, जीएमएस आणि सीएमएस पावडर घाला.
  4. नीट मिक्स करा.
  5. १ कप दूध बाकीच्या गरम झालेल्या दूधात मिक्स करा.
  6. सारखे ढवळत रहा.
  7. दूधाला १ उकळी येउ दया.
  8. हे दाट झालेले दूध थंड झाले की एका डब्यात भरुन फ्रीजर मध्ये ठेवा.
  9. ४ तास फ्रीजर मध्ये राहू दया.
  10. तोपर्यंत कोनफळ उकडून घ्या.
  11. कोनफळाचे साल काढून तुकडे करा.
  12. द्राक्ष स्वच्छ धुवून, त्यांचा पल्प करुन घ्या.
  13. पल्प गाळून घ्या.
  14. पल्प मध्ये साखर व कॉर्नफ्लावर घालून शिजवून घ्या.
  15. द्राक्षाचे हे सिरप बाजूला ठेवा.
  16. आता कोनफळ व थोडी द्राक्ष मिक्सरला बारीक करा.
  17. आईसक्रीम बाहेर काढा.
  18. आईसक्रीम मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
  19. आईसक्रीम मध्ये कोनफळ, द्राक्षाचा पल्प, क्रीम घाला.
  20. द्राक्षाचे थोडे सिरप घाला.
  21. थोडे मनुके घाला.
  22. आईसक्रीम डब्यात भरून फ्रीजर मध्ये ८ तास सेट करण्यासाठी ठेवा.
  23. ८ तासानंतर स्कूपने आईसक्रीम काढा.
  24. वर द्राक्षाचा सिरप व कोनफळाने सजवा.
  25. तयार आहे कोनफळ व द्राक्षाचे आईसक्रीम.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE