Home / Recipes / Patodichi amati(samaara)

Photo of Patodichi amati(samaara) by Ajinkya Shende at BetterButter
228
7
0.0(0)
1

Patodichi amati(samaara)

Feb-19-2018
Ajinkya Shende
10 minutes
Prep Time
25 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

 • Veg
 • Medium
 • Dinner Party
 • Maharashtra
 • Main Dish
 • Healthy

Ingredients Serving: 4

 1. *आमटीसाठी-
 2. १ चमचा बाजरी
 3. १ चमचा चना डाळ
 4. अर्धा चमचा तांदूळ
 5. १ मोठा कांदा बारीक कापलेला
 6. अर्धी वाटी किसलेलं खोबरं
 7. ८-१० पाकळ्या लसुण
 8. छोटा तुकडा आलं
 9. कोथिम्बीर
 10. तेल
 11. जीरं
 12. मोहोरी
 13. हींग
 14. लाल मिर्ची पावडर १ चमचा
 15. खांदेशी काळा मसाला १ चमचा
 16. धणा जीरा पावडर अर्धा चमचा
 17. अर्धा चमचा गरम मसाला
 18. पाव चमचा हळद
 19. मीठ
 20. कोथिम्बीर
 21. *पाटोडीसाठी-
 22. दिड वाटी बेसन
 23. मीठ
 24. अर्धा चमचा ओवा
 25. हळद पाव चमचा
 26. लाल मिर्ची पावडर साधारण पाऊण चमचा

Instructions

 1. प्रथम कांदा,खोबरं,बाजरी,चना डाळ,तांदूळ हे सर्व जिन्नस तेल न टाकता कढई मधे तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
 2. थोडं थंड झाल्यावर त्यात लसुण,आलं व थोडी कोथिम्बीर टाकून मिक्सर मधे वाटून घ्या.
 3. नंतर कढई मधे ५-६ चमचे तेल टाकुन तेल तापल्यावर त्यात हींग,जीरं,मोहोरीची फोडणी देवून त्यात कांदा-खोबऱ्याचं वाटण टाकून थोडं परतवुन घ्या.
 4. नंतर त्यात लाल मिर्ची पावडर,काळा मसाला,हळद,गरम मसाला व धणा जीरा पावडर टाकून तेल सुटेपर्यंत परतवुन घ्या.
 5. नंतर हयात आवश्यकतेनुसार पाणी व चवीप्रमाणे मीठ टाकून कमी आचेवर आमटी उकळू द्या.
 6. आमटी उकळेपर्यंत बेसन पीठात ओवा,मीठ,लाल मिर्ची पावडर व थोडी हळद टाकून बेसन पीठ घट्ट भीजवुन घ्यावे.
 7. हे पीठ पाच मिनिट मुरल्यावर त्याची जाड पोळी लाटुन मोठ्या शंकरपाळ्याप्रमाणे कापून आमटीला एक ऊकळी आल्यानंतर हया पाटोडया व थोडी कोथिम्बीर आमटीत टाकून आमटी मध्यम आचेवर पाटोडया व्यवस्थित शिजेपर्यंत ऊकळू द्यावी.
 8. तयार आमटी/समारं सर्विंग बाऊल मधे काढून वरून थोडी कोथिम्बीर टाकून गार्निश करुन घ्यावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE