Home / Recipes / Kuradi chi bhaji

Photo of Kuradi chi bhaji by Ajinkya Shende at BetterButter
1408
6
0.0(0)
0

Kuradi chi bhaji

Feb-24-2018
Ajinkya Shende
20 minutes
Prep Time
15 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Kuradi chi bhaji RECIPE

सहसा आपण कुरडई तळून खातो,पण ही झटपट होणारी कुरडई ची भाजी पण अतिशय चविष्ट असते..

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Maharashtra
  • Breakfast and Brunch

Ingredients Serving: 2

  1. ३ कुरडया(हाताने चुरुन २० मीनिट पाण्यात भीजवुन ठेवाव्या)
  2. कांदे २ मध्यम आकाराचे बारीक कापलेले
  3. ५-६ पाकळ्या लसुण बारीक कापलेला
  4. फोडणीसाठी तेल,जीरं,मोहोरी,हींग
  5. लाल मिर्ची पावडर अर्धा चमचा
  6. काळा किंवा गोडा मसाला अर्धा चमचा
  7. धणा जीरा पावडर अर्धा चमचा
  8. हळद पाव चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. कोथिम्बीर

Instructions

  1. प्रथम पॅन मधे ३-४ चमचे तेल टाकून तेल तापल्यावर त्यात जीरं,मोहोरी,हींग आणि लसुण टाकून थोडं परतवुन घ्यावे.
  2. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतवुन घ्यावा.
  3. नंतर त्यात लाल मिर्ची पावडर,काळा/गोडा मसाला,धणा जीरा पावडर,हळद टाकून थोडं परतवुन घ्यावे.
  4. नंतर त्यात भीजवलेली कुरडई व चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करुन झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी. झाकण काढून त्यात थोडी बारीक चिरलेली कोथिम्बीर टाकून थोडं परतवुन गॅस बंद करावा.
  5. गरम,खमंग व थोड्या कडक शेकलेल्या पोळीसोबत ही भाजी सर्व करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE