Home / Recipes / Khandeshi khaparavarchi puranpoli

Photo of Khandeshi khaparavarchi puranpoli by Ajinkya Shende at BetterButter
1570
11
0.0(0)
0

Khandeshi khaparavarchi puranpoli

Feb-25-2018
Ajinkya Shende
105 minutes
Prep Time
45 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Khandeshi khaparavarchi puranpoli RECIPE

पूरणपोळी म्हणजे महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि खांदेशी खापरावरची पूरणपोळी म्हणजे खुप वैशिष्ट्यपूर्ण,मऊ व अत्यंत चविष्ट.ही पूरणपोळी ३-४ दिवससुद्धा मऊ राहते.

Recipe Tags

  • Holi
  • Medium
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 4

  1. *पुराणासाठी-
  2. २ वाटी चण्याची डाळ(स्वच्छ धुवून २ ग्लास पाणी टाकून कूकर मधे ३ शिटया घेवून शिजवलेली)
  3. २ वाटी साखर
  4. अर्धा चमचा वेलची जायफळ पुड
  5. *इतर साहित्य-
  6. ५ वाटी चांगल्या प्रतीचा मैदा
  7. मीठ पाऊण चमचा
  8. साखर पाव चमचा
  9. तेल १ चमचा

Instructions

  1. *पूरण बनवन्यासाठी-
  2. प्रथम शिजवलेल्या डाळीमधील पूर्ण पाणी निथरवुन घ्यावे.
  3. नंतर एका पॅन मधे डाळ व साखर टाकून पूरण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत शिजवुन घ्यावे.
  4. नंतर पूरण यांत्रातुन स्मूथ पूरण तयार करुन घ्यावे.
  5. नंतर एका पराती मधे मैदा,मीठ,साखर व तेल टाकून मैदा आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी टाकून सैल भिजवुन घ्यावा व १० मिनिट मैदा रगडून/मळून(knead) घ्यावा व अर्धा तास ओला कपडा टाकून झाकुन ठेवावा.
  6. नंतर ह्याचे सारख्या आकारचे गोळे(उंडे) बनवून ओल्या कापडावर ठेवून पुन्हा अर्धा तास वरून सुद्धा ओला कपडा टाकून झाकुन ठेवावे.
  7. नंतर खापर म्हणुन अल्युमिनियम ची मोठी कढई गॅस व उलटी ठेवून(मातीचं खापर असल्यास उत्तम) सर्व बाजूने तेल व मीठ लावून घ्यावे व खापर व्यवस्थित तापवुन घ्यावे.(कढई च्या खाली खापरासाठी स्टॅंड ठेवावं नसेल तर काहीही ठेवू शकता उदा.छोटे स्टील चे डबे वगरे.)
  8. नंतर २ गोळ(उंडे) पोळपाटावर घेवून मध्यभागी जाड ठेवून काठ हाताने थोडे बारीक करुन घ्यावे,एका पारीवर पूरण ठेवून दूसरी पारी त्यावर ठेवून काठ व्यवस्थित बंद करुन घ्यावेत व पोळी थोडी लाटुन घ्यावी.
  9. नंतर ही पोळी व्यवस्थित हातावर घेवून मोठी करुन(घडवून) घ्यावी.
  10. नंतर ही पोळी व्यवस्थित खपरावर टाकून(फाटणार नाही याची काळजी घ्यावी) दोन्ही बाजूने खरपुस शेकुन घ्यावी.
  11. नंतर पोळीची घडी करुन अर्धा मिनिट खापरावार ठेवावी जेणेकरुन काठ व्यवस्थित शिजतील.
  12. तयार पोळी गरम गरम कटाची आमटी(सार) व साजुक तुपासोबत सर्व करावी.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE