Home / Recipes / Soya-Cheese-Balls

Photo of Soya-Cheese-Balls by Anuradha Kuvalekar at BetterButter
86
5
0.0(0)
0

Soya-Cheese-Balls

Mar-13-2018
Anuradha Kuvalekar
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

Recipe Tags

 • Veg
 • Medium
 • Dinner Party
 • Frying
 • Breakfast and Brunch
 • Healthy

Ingredients Serving: 4

 1. १ वाटी सोयाबीनचे दाणे ( ८-१० तास भिजवून ठेवा.)
 2. ३ उकडलेले बटाटे
 3. १ चमचा आलं-मिरचीची पेस्ट
 4. १ चमचा चाट मसाला
 5. १ चमचा तंदूरी मसाला
 6. २ चमचे धने पावडर
 7. १/२ चमचा गरम मसाला
 8. १/२ चमचा हळद
 9. १/२ चमचा लाल तिखट
 10. १/२ वाटी नाचणीचे पीठ
 11. १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 12. चिमुटभर खायचा सोडा
 13. १ वाटी ब्रेड क्रम्पस
 14. २-३ चमचे काॅर्नप्लोअर 
 15. २ चीझचे क्युब
 16. मीठ चवीनुसार
 17. तेल तळण्यासाठी

Instructions

 1. सोयाबीनचे दाणे मिक्सरमध्ये पाणी न घालता भरड वाटून घ्या. वाटलेले सोयाबीन एका भांड्यात काढून घ्यावे.
 2. त्यात उकडलेले बटाटे मॅश करून घाला. आलं-मिरचीची पेस्ट, चाट मसाला, तंदूरी मसाला, धने पावडर, गरम मसाला, लाल तिखट, हळद, १/२ वाटी नाचणीचे पीठ, १/२ वाटी ब्रेड क्रम्पस, बारीक चिरलेली कोथिंबीर, खायचा सोडा व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा. मिश्रण कोरडे वाटल्यास थोडेसे पाणी घालून एकत्र करा. 
 3. एका चीझ क्युबचे ८-९ छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या.
 4. तयार मिश्रणाची वाटी करून त्यात चीझचा तुकडा भरून त्याचे बाॅल्स करून घ्या.
 5. २-३ चमचे काॅर्नप्लोअर मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या.
 6. तयार बाॅल्स काॅर्नप्लोअरच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्पस मध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे व शेझवान साॅस बरोबर सर्व्ह करावे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE