Home / Recipes / Prawn biryani

Photo of Prawn biryani by Aarti Nijapkar at BetterButter
2081
4
0.0(0)
0

Prawn biryani

Mar-25-2018
Aarti Nijapkar
60 minutes
Prep Time
60 minutes
Cook Time
4 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Prawn biryani RECIPE

झिंगा बिर्याणी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत म्हणजे कांद्याची पेस्ट आणि फ्रेश क्रीम वापरून

Recipe Tags

  • Non-veg
  • Easy
  • Dinner Party
  • Steaming
  • Sauteeing
  • Main Dish
  • Healthy

Ingredients Serving: 4

  1. झिंगा मरीनेशन
  2. झिंगा ३५० ग्रॅम
  3. आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
  4. कांदा पेस्ट ३ मोठे चमचे
  5. हळद १/४ लहान चमचा
  6. लाल तिखट १/२ मोठा चमचा
  7. दही १ मोठा चमचा
  8. मीठ १/२ लहान चमचा
  9. बिर्याणी भातासाठी
  10. बासमती तांदूळ ५०० ग्रॅम
  11. तेल १ मोठा चमचा
  12. काळीमिरी ३ ते ४
  13. लवंग ३ ते ४
  14. दालचिनी १ मध्यम
  15. हिरवी वेलची २ ते ३
  16. मीठ १ मोठा चमचा
  17. लिंबाचा वरचा कापलेला भाग
  18. पाणी तांदूळ मावेल तेवढे
  19. मसालासाठी
  20. तेल २ मोठे चमचे
  21. कांदा पेस्ट १/२ वाटी
  22. आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा
  23. पुदिना कोथिंबीर पेस्ट १ मोठा चमचा
  24. लाल तिखट १ १/२ मोठा चमचा
  25. धने पावडर १ लहान चमचा
  26. जिरे पावडर १ लहान चमचा
  27. बिर्याणी मसाला १ लहान चमचा
  28. गरम मसाला १ लहान चमचा
  29. फ्रेश क्रीम १/३ वाटी
  30. मीठ चवीनुसार
  31. तळलेला कांदा १/३ वाटी
  32. कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
  33. केसर दुधात भिजवलेली २ मोठे चमचे

Instructions

  1. झिंगला मारीनेशन करून ठेवा
  2. तांदूळ धुऊन पाण्यात भिजत ठेवा
  3. सर्व प्रथम भात शिजवून घ्या टोपात तेल घालून सर्व खडा मसाला घालून परतवून घ्या मग पाणी घालून मीठ घाला व उकळवून घ्या पाणी उकळल्यावर भिजवलेले तांदूळ घाला व लिंबाचा तुकडा घाला अर्धे शिजले की पाणी गलीन घ्या व तांदूळ सुटे करून ठेवा
  4. आता कांदा पातळ कापून तळून घ्या
  5. एका टोपात तेल घालून तापवा मग कांद्याची पेस्ट व आलं लसूण व पुदिना कोथिंबीर पेस्ट घालुन चांगलं परतवून घ्या कच्चा वास निघू द्या
  6. सर्व सुखे मसाले घालून मिश्रण एकजीव करून घ्या मासाल्यांना तेल सुटले की झिंगाच मिश्रण घालून एकजीव करून घ्या वाफेवर शिजवून घ्या
  7. शिजल्यावर फ्रेश क्रीम व तळलेला कांदा घालून पुन्हा एकजीव करून वाफवून घ्या व गॅस बंद करा
  8. आता तयार भाताचे लेयर करून त्यात झिंगा मसाला घालून बिर्याणीचे थर करून घ्या वर केसर भात ठेवा मग तळलेला कांदा कोथिंबीर घालून थोडं तूप घालून झाकण घट्ट ठेवून वाफवून घ्या टोपाखाली तवा ठेवा मध्यम आचेवर पूर्ण शिजवून घ्या झाकणावर जड पाण्याने भरलेला टोप ठेवा वाफ चांगली येऊन भात मस्त शिजेल
  9. तयार झिंगा बिर्याणी गरमागरम सर्व्ह करा कोणत्याही रायता किंवा कोशिंबीर सोबत

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE