Home / Recipes / Sweet pizza

Photo of Sweet pizza by Nayana Palav at BetterButter
641
17
0.0(0)
0

Sweet pizza

May-04-2018
Nayana Palav
5 minutes
Prep Time
10 minutes
Cook Time
6 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Sweet pizza RECIPE

खव्याची बर्फी, किंवा खवा घालून केलेले पदार्थ, आपण नेहमीच करतो. पण खव्याचा काहीतरी हटके पदार्थ बनवावा. म्हणून मी गोड पिझ्झा या रेसिपीचा शोध लावलाय.

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Festive
  • Fusion
  • Sauteeing
  • Dessert
  • Healthy

Ingredients Serving: 6

  1. खवा २०० ग्राम
  2. तूप १ टेबलस्पून
  3. मिल्क पावडर २० ग्राम
  4. साखर ३ टेबलस्पून किंवा आवश्यकतेनुसार
  5. वेलचीपूड १/२ टीस्पून
  6. फणसाचा गरा १ सजावटीसाठी
  7. चेरी २ सजावटीसाठी
  8. अंजीर २ सजावटीसाठी
  9. काळे मनुके ३-४ सजावटीसाठी
  10. हिरवी बडीशेप १/२ टीस्पून सजावटीसाठी
  11. अक्रोड सजावटीसाठी
  12. काजू सजावटीसाठी
  13. पिस्ता सजावटीसाठी
  14. सिल्व्हर बाॅल्स सजावटीसाठी
  15. किसलेले खोबरे सजावटीसाठी

Instructions

  1. एक भांडे गॅसवर ठेवा.
  2. त्यात तूप घालून खवा जरा परतून घ्या.
  3. आता मिल्क पावडर व साखर घाला.
  4. आता हे मिश्रण थंड झाले की नीट मळून घ्या.
  5. एका ताटाला तूप लावून खव्याचे मिश्रण गोल आकारात थापून घ्या.
  6. आता यावर किसलेले खोबरे घाला.
  7. बदाम, पिस्ता, काजू कापून घ्या.
  8. चेरी, फणस इत्यादी कापून घ्या.
  9. हे साहित्य पिझ्झ्या वर घाला.
  10. तयार आहे तुमचा स्वादिष्ट गोड पिझ्झा.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE