Home / Recipes / Veg.Tambada Rassa

Photo of Veg.Tambada Rassa by Ajinkya Shende at BetterButter
2129
5
0.0(0)
1

Veg.Tambada Rassa

May-20-2018
Ajinkya Shende
15 minutes
Prep Time
20 minutes
Cook Time
2 People
Serves
Read Instructions Save For Later

ABOUT Veg.Tambada Rassa RECIPE

तांबडा रस्सा हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याची शान वाढवणारा पदार्थ आहे,पण शक्यतो तांबडा रस्सा हा मांसाहारामध्ये मोडतो..म्हणून खास शकाहारींसाठी हा व्हेज तांबडा रस्सा...

Recipe Tags

  • Veg
  • Easy
  • Everyday
  • Maharashtra
  • Main Dish

Ingredients Serving: 2

  1. १ बारीक कापलेला लहान कांदा
  2. ३ चमचे कीसलेलं सुकं खोबरं
  3. अर्धा इंच आल्याचा तुकडा
  4. ५-६ लसूण पाकळ्या
  5. खडा मसाला(१ मसाला वेलची,२ हिरव्या वेलची, छोटा दालचिनीचा तुकडा,३-४ काळी मिरी,३-४ लवंगा)
  6. एका लहान कांद्याच्या मोठ्या चौकोनी आकारात कापलेल्या फोडी
  7. एका लहान बटाट्याच्या मध्यम चौकोनी आकारात कापलेल्या फोडी
  8. एका लहान टोमॅटोच्या मोठ्या चौकोनी आकारात कापलेल्या फोडी
  9. सिमला मिरचीच्या मोठ्या चौकोनी आकारात कापलेल्या ५-६ फोडी
  10. फ्लॉवर चे ५-६ मोठे तुकडे
  11. पाव वाटी ताजे हिरवे वाटणे
  12. पाव वाटी हव्या त्या आकारात कापलेली फरसबी
  13. बारीक कापलेली ५-६ कढीपत्त्याची पानं
  14. पाव वाटी तेल
  15. अर्धा चमचा जीरं
  16. पाव चमचा साखर
  17. २ चमचे कांदा-लसूण मसाला
  18. १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
  19. अर्धा चमचा धणा जीरा पावडर
  20. पाव चमचा हळद
  21. चवीप्रमाणे मीठ
  22. बारीक कापलेली कोथिंबीर

Instructions

  1. प्रथम सुकं खोबरं व सर्व खडा मसाला थोडा भाजून ५ मिनिट गरम पाण्यात भिजवून ठेवावा.
  2. नंतर बारीक कापलेला कांदा,लसूण,आलं व पाण्यात भिजवलेलं सुकं खोबरं व खडा मसाला ह्याची मिक्सर मध्ये स्मूथ मसाला पेस्ट बनवून घ्यावी.
  3. नंतर एका पॅन मध्ये साधारण दीड ग्लास पाणी टाकून पाणी उकळल्यावर त्यात बटाटा,वाटाणे,फरसबी,फ्लॉवर,किसलेलं आलं आणि बारीक कापलेला कढीपत्ता टाकून हे पाणी साधारण १० मिनिट उकळवून घ्यावं.
  4. तोपर्यंत एका कढईत पाव वाटी तेल टाकून तेल तापल्यावर त्यात जीरं,साखर व कांदा, टोमॅटो,सिमला मिरची टाकून थोडं परतवून घ्यावे.
  5. नंतर त्यात मसाला पेस्ट टाकून साधारण २-३ मिनिट परतवून त्यात सर्व मसाले टाकून ही पेस्ट तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावी.
  6. नंतर त्यात उकळत ठेवलेल्या भाज्या पाण्यासकट टाकाव्या व त्यात आवश्यकतेनुसार मीठ,कोथिंबीर टाकून रस्सा साधारण ८-१० मिनिट उकळवून घेणे.
  7. तयार रस्सा सर्विंग प्लेट मध्ये काढून वरून कोथिंबीर टाकून गार्निश करून घेणे व ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करणे.

Reviews (0)  

How would you rate this recipe? Please add a star rating before submitting your review.

Submit Review

Similar Recipes

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
SHARE