मँगो पॅना कोट्टा | Mango Panna cotta Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  28th May 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Panna cotta recipe in Marathi,मँगो पॅना कोट्टा, Deepa Gad
मँगो पॅना कोट्टाby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  तास
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

मँगो पॅना कोट्टा recipe

मँगो पॅना कोट्टा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Panna cotta Recipe in Marathi )

 • आंब्याचा पल्प दीड कप
 • दूध १ कप
 • क्रीम १ कप
 • जिलेटीन ४ च
 • कोमट पाणी ६ च
 • साखर १/४ कप
 • सजावटीसाठी :
 • चेरी, आंब्याचे तुकडे
 • पुदिना पाने

मँगो पॅना कोट्टा | How to make Mango Panna cotta Recipe in Marathi

 1. प्रथम आंब्याचा पल्प दुसर काहीही न घालता करा
 2. बाऊलमध्ये ३ च कोमट पाण्यात २ च जिलेटीन घालून मिक्स करा
 3. हे मिश्रण आंब्याच्या पल्प मध्ये घालून एकजीव करा
 4. काचेचे ग्लास घेऊन ते ग्लास ट्रे मध्ये तिरके ठेवा व त्यात हे आंब्याचे मिश्रण अलगद अर्धा ग्लास घाला हा झाला पहिला लेअर
 5. ट्रे सहित हे ग्लास फ्रीजमध्ये २ तास सेट करा
 6. दुसऱ्या लेयरसाठी गॅसवर भांड्यात दूध गरम होईपर्यंत बाऊलमध्ये परत ३ च कोमट पाण्यात २ च जिलेटीन घालून मिक्स करा
 7. व ते जिलेटीन चे मिश्रण दुधात घाला
 8. क्रीम, साखर घालून चांगल एकजीव करा
 9. हे दुधाचे मिश्रण थोडं थंड झालं की सेट केलेल्या ग्लासात ओता
 10. व परत ते ग्लास फ्रीजमध्ये २ तास सेट करा
 11. सजावटीसाठी वर चेरी, पुदिना पाने , आंब्याचे तुकडे घालून थंड सर्व करा

My Tip:

पहिला लेअर सेट झाल्याशिवाय दुसरा लेअर घालू नये

Reviews for Mango Panna cotta Recipe in Marathi (0)