हापूस आंब्याचे उकडीचे मोदक | Mango Modak Recipe in Marathi

प्रेषक Sunil Chavan  |  2nd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Modak recipe in Marathi,हापूस आंब्याचे उकडीचे मोदक, Sunil Chavan
हापूस आंब्याचे उकडीचे मोदकby Sunil Chavan
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  90

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

10

0

हापूस आंब्याचे उकडीचे मोदक recipe

हापूस आंब्याचे उकडीचे मोदक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Modak Recipe in Marathi )

 • २ हापूसचे पिकलेले आंबे
 • एका नारळाच किसलेल खोबर
 • पाव किलो गुळ
 • वेलची पावडर
 • चिुमुटभर मिठ
 • १ चमचा तूप
 • २ पेले मोदकाच पिठ
 • २ पेले पाणी

हापूस आंब्याचे उकडीचे मोदक | How to make Mango Modak Recipe in Marathi

 1. प्रथम कढईत तूप टाकून त्यावर. किसलेल खोबर परतून त्यात गुळ मिक्स करून एकजीव कराव वरून वेलची पूड घालून मिक्स कराव
 2. एका आंब्याचे बारीक बारीक तूकडे करून घ्यावे
 3. १ आंबा मिक्सरला लावून त्याचा आमरस करून घ्यावा
 4. आंब्याच्या फोडी सारणात मिक्स करायच्या
 5. एका टोपात १ चमचा तूप २ पेले पाणी घालून गँसवर ठेवा चिमुटभर मिठ घालून उकळी आली की त्यात २ पेले मोदकाच पिठ घालून व्यवस्थीत ढवळून २ मिनिट झाकण ठेवा
 6. उकडलेल मोदकाच पिठ मळताना त्यात आमरस घालून व्यवस्थीत मळून घ्या
 7. छोटे गोळे घेवून त्याची लाती बनवून त्यात सारण भरून मोदक बनवा चाळणीत ठेवून कुकरची शिट्टी काढून वाफवून घ्या

Reviews for Mango Modak Recipe in Marathi (0)