कैरीचे लोणचे (पटकन होणारे) | Quick Mango Pickle Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Quick Mango Pickle recipe in Marathi,कैरीचे लोणचे (पटकन होणारे), Sujata Hande-Parab
कैरीचे लोणचे (पटकन होणारे)by Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

3

0

कैरीचे लोणचे (पटकन होणारे) recipe

कैरीचे लोणचे (पटकन होणारे) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Quick Mango Pickle Recipe in Marathi )

 • कच्चे आंबे - 1 कप - एकदम बारीक तुकडे केलेले (जून असतील तर सालीसह बाट काडून घेतलेले)- मी तोतापुरी वापरला
 • साखर - एक छोटी चिमूटभर
 • हळद - १ टीस्पून 
 • लाल तिखट पावडर - १ १/२ टेबलस्पून
 • मीठ चवीनुसार 
 • फोडणीसाठी - तेल - ३ टेबलस्पून
 • लसूण पाकळ्या - ४-५ सोलून बारीक चिरलेल्या 
 • राई - १/२ टेबलस्पून जाडसर भरड केलेली (जास्त बारीक करू नये.)
 • हिंग - १/२ टीस्पून
 • मेथी पावडर - १ टीस्पून

कैरीचे लोणचे (पटकन होणारे) | How to make Quick Mango Pickle Recipe in Marathi

 1. एक वाडग्यात बारीक कापलेल्या आंब्याच्या फोडी, हळद आणि मीठ लावून १५ मिनिटांसाठी ठेवा.
 2. एका तडका पॅन मध्ये किंवा टोपात मंद आचेवर तेल टाका. थोडे गरम झाले कि त्यात कापलेली लसूण टाका.
 3. लसूण थोडी ३/४ भाजल्यावर राई टाका. तडतडू द्या. त्यात हिंग, मेथी पावडर टाका. १/२ मिनिट तसेच ठेवा. गॅस बंद करून तडक थोडा थंड होऊ द्या.
 4. तो आंब्याच्या फोडीवर टाका.
 5. लाल तिखट पूड, साखर टाका. व्यवस्तिथ मिक्स करून घ्या.
 6. मीठ आणि तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू सक्त.
 7. बरणीत भरून रेफ्रिजेरटर मध्ये ठेवावे.

My Tip:

तिखट मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कुठलाही आंबा,कैरी चालू शकते. कैरी जास्त आंबट असल्यास मिठाचे प्रमाण वाढेल

Reviews for Quick Mango Pickle Recipe in Marathi (0)