आंबा कस्टर्ड टार्ट | Mango Custard Tart Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
 • Mango Custard Tart recipe in Marathi,आंबा कस्टर्ड टार्ट, Sujata Hande-Parab
आंबा कस्टर्ड टार्टby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  8

  1 /2तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

1

आंबा कस्टर्ड टार्ट recipe

आंबा कस्टर्ड टार्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Custard Tart Recipe in Marathi )

 • नुटरी चॉईस क्रॅकर / ग्रॅहम क्रॅकर बिस्किट्स - १ १/२ - 2 कप (4 " टार्ट )
 • आंबा प्युरी (घट्ट) - ८-९ टेबलस्पून . (हापूस आंबा)
 • लोणी किंवा बटर - 2-3 चमचे.
 • साखर - १/२ कप
 • पिठी साखर बाहेरच्या बिस्कीट आवरणासाठी -१ टेबलस्पून
 • व्हेज जिलेटिन पावडर - ३/४ टेबलस्पून
 • टांगलेले किंवा हंग दही - 6 टेबलस्पून
 • पाणी - 2 टेबलस्पून जेलिटेन ब्लूम किंवा फुलवण्यासाठी 
 • कस्टर्डसाठी - व्हनिला कस्टर्ड पावडर - 1 टेबलस्पून
 • साखर - 1 1/2 टेबलस्पून
 • गरम दूध - ३/४ -१ कप
 • सजावटीसाठी पातळ काप केलेला आंबा - 1 कप 
 • चॉकलेट सिरप - 2 टेबलस्पून

आंबा कस्टर्ड टार्ट | How to make Mango Custard Tart Recipe in Marathi

 1. ब्लेंडरमध्ये नुटरी चॉईस क्रॅकर्स १५-१६ घ्या आणि रवाळ वाटून घ्या.
 2. वाडग्यामध्ये बिस्कीटचा चुरा ,लोणी किंवा बटर, पिठी साखर घ्या. चांगले एकत्र होईपर्यंत नीट ढवळून घ्यावे.
 3. हलक्याने हाताने 4 इंचच्या टार्ट साच्यात व्यवस्तीत पसरून घ्यावे. मिश्रण दाबा. ते १ १/२ ते २ इंच उंचीवर पसरवणे;
 4. थोडे दाबून फ्रिजमध्ये कमीतकमी 15-20 मिनिटे ठेवावे.
 5. एका बाऊलमध्ये आंब्याचा घट्ट रस आणि हंग दही घेऊन हाताच्या विस्कर चा वापर करून चांगले फेटून घ्यावे.
 6. कस्टर्डसाठी, एका वाटीत थोडे दूध घेऊन त्यात व्हॅनिला कस्टर्ड पावडर चांगली मिसळून घ्यावी.
 7. एका पॅनमध्ये दूध गरम करून त्यात साखर घालून चांगले मिक्स करावे. केलेले कस्टर्ड मिश्रण ओतावे.
 8. साखर वितळून मिश्रण थोडे जाडसर होईस्तो पर्यंत शिजवून घ्यावे.
 9. एक सॉस पॅनमध्ये पाणी घ्या, जिलेटिन घाला. ते फुलू किंवा फुगू द्या.
 10. फुगल्यावर त्यात साखर घालून ती वितळे पर्यंत गॅस वर ठेवावे. आच मंद ठेवावी.
 11. आंबा प्युरी आणि दही मिश्रण टिकवा. मिश्रण व्यवस्थित एकत्र होईपर्यंत ढवळून घ्या.
 12. ताबडतोब तयार केलेल्या बिस्कीट टार्ट साच्यात भरा. रबर चमचा वापरून वरचा भाग सपाट करू घ्या. १०-१५ मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
 13. आता कस्टर्ड मिश्रण त्यावर पसरावा. प्लास्टिक किंवा कलिंग रॅप ने कव्हर करा.
 14. 6-7 तासांपर्यंत कडक होईपर्यंत रेफ्रिजरेट करा.
 15. आंबा तुकडे आणि चॉकलेट सिरप वर टाकून थंड सर्व्ह करावे.

My Tip:

आंब्याचा रस गोडं आणि ताजा असावा.

Reviews for Mango Custard Tart Recipe in Marathi (1)

Nayana Palav5 months ago

Lovely
Reply
Sujata Hande-Parab
5 months ago
Thank you dear.. :heart_eyes::heart_eyes: