फ्रुट / फळ टार्ट | Fruit Tart Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  3rd Jun 2018  |  
5 from 1 review Rate It!
  • Fruit Tart recipe in Marathi,फ्रुट / फळ टार्ट, Aarti Nijapkar
फ्रुट / फळ टार्टby Aarti Nijapkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    25

    मि.
  • किती जणांसाठी

    3

    माणसांसाठी

2

1

फ्रुट / फळ टार्ट recipe

फ्रुट / फळ टार्ट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fruit Tart Recipe in Marathi )

  • मैदा १ कप
  • मीठ चिमूटभर
  • बटर २ मोठे चमचा
  • साखर पावडर १ मोठा चमचा
  • बेकिंग पावडर चिमुठभर 
  • दूध १ मोठा चमचा किंवा आवश्यकतेनुसार 
  • फळ
  • काळी द्राक्ष
  • सफरचंद
  • अननस
  • स्ट्रॉबेरी
  • फ्रुट जेल

फ्रुट / फळ टार्ट | How to make Fruit Tart Recipe in Marathi

  1. १८०*से वर ओवन तापवून घ्या 
  2. प्रथम एका भांड्यात मैदा चाळून घ्या 
  3. मग मीठ , साखर , फ्रोजन बटर , बेकिंग पावडर एकत्र करून घ्या 
  4. मग बटर आणि मैदा एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्या 
  5. दूधाची आवश्यकता असल्यास दूध घालावे
  6. मळून झाल्यावर गोळा करून थोडा वेळ फ्रिज मध्ये ठेवावे
  7. मग गोलाकार लाटून टाटच्या मोल्डवर घालून दाबून जास्तीच पीठ काढावे
  8. मग टोचाच्या चमच्याने टोचे पाडून घ्या त्यामुळे टाट फुगणार नाही 
  9. ओवन मध्ये टाट १८०* से वर १० ते १२ मि. बेक करुन घ्या 
  10. थंड करण्यास ठेवून द्या 
  11. सर्व फळ धुवून घ्या
  12. सफरचंदाचे , अननसाचे, स्ट्रॉबेरी चे काप काप करा
  13. द्राक्ष व इतर फळे जेल मध्ये घोळवून घ्या
  14. टार्ट ला मिक्स फळांचा जाम लावून घ्या
  15. मग त्यावर सर्व फळ ठेवून घ्या
  16. आता फळांचा टार्ट खाण्यास तयार आहे

My Tip:

आवडीचे फळे वापरू शकता जाम च्या ऐवजी व्हीप्ड क्रीम वापरू शकता

Reviews for Fruit Tart Recipe in Marathi (1)

Nayana Palav6 months ago

Excellent
Reply