मुख्यपृष्ठ / पाककृती / सोलकढी

Photo of Solakadhi by Pranali Deshmukh at BetterButter
378
2
0(0)
0

सोलकढी

Jun-03-2018
Pranali Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोलकढी कृती बद्दल

नारळाचं दूध आणि कोकम एक सुंदर अप्रतिम चव म्हणजे सोलकढी

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • ब्लेंडींग
 • अकंपनीमेंट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. ताज्या नारळाचं दुध २ कप
 2. ४-५ सोलं (आमसुलं/ कोकम )
 3. १ हिरवी मिरची
 4. १ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून
 5. १-२ लसूण पाकळ्या
 6. १/२ टीस्पून साखर मीठ

सूचना

 1. कप ताज्या खोब-याचे तुकडे आणि १ कप पाणी मिक्सर किंवा ब्लेंडर मध्ये घालून त्याची प्युरी करा.
 2. सुती कपड्यातून हि प्युरी गाळुन घ्या आणि घट्ट पिळून नारळाचं दुध काढा.
 3. तोच चोथा पुन्हा थोड्या पाण्यात घालून याच पद्धतीने दुध काढा. साधारण एका नारळातून २ १/२ कप दुध निघतं
 4. उरलेला चोथा फेकून द्या. रेडीमेड कोकोनट मिल्क वापरणार असाल तर १ कप कोकोनट मिल्क घ्या आणि त्यात १ कप पाणी घालून पात्तळ करून घ्या.
 5. पाण्यात सोलं ३०-३५ मिनिटे भिजत घाला म्हणजे कोकमाचा अर्क पाण्यात उतरेल.
 6. अर्ध्या तासाने कोकमाचं पाणी नारळाच्या दुधात घालून कोकम बाजूला काढून ठेवा
 7. नंतर साखर मीठ घालून ढवळून घ्या. हिरवी मिरची तुकडे करून घाला
 8. लसूण ठेचून घाला. वरून कोथिंबीर बारीक चिरून घाला आणि तयार कढी फ्रीज मध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर