Photo of Spinach Cheesy Modak by Sujata Hande-Parab at BetterButter
495
6
0.0(2)
0

Spinach Cheesy Modak

Jun-06-2018
Sujata Hande-Parab
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्लेंडींग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पालक पीठ च्या आवरण साठी - पालक प्युरी - १/२ कप
  2. तांदुळाचे पीठ - १ कप
  3. पाणी - १/४ कप
  4. तूप - 1 टेबलस्पून
  5. चवीनुसार मीठ
  6. सारण - गाजर - 1 कप मिक्सर ला थोडासा बारीक करून घेलतेला मिन्सड
  7. कोबी - १/२ कप मिक्सर ला थोडासा बारीक करून घेलतेला मिन्सड
  8. लसूण पाकळ्या - 3-4 बारीक चिरून
  9. कांदा - १/२ बारीक चिरून
  10. हिरवी मिरची जाडसर वाटलेली - १
  11. काळे मिरी कुटलेली - १ टिस्पून 
  12. सोया सॉस- १/४ टीस्पून
  13. किसलेले चीज किंवा क्रीम चीज - २ टेबलस्पून 
  14. तेल - १/२ टेबलस्पून 
  15. चवीनुसार मीठ
  16. सर्विंग साठी - लाल मिरचीची पातळ तिखट चटणी किंवा मोमोस बरोबर खातो ती चटणी

सूचना

  1. आवरण पिठा साठी - एक पॅन मध्ये पालक पुरी आणि पाणी, मीठ आणि तूप घालून उकळून घ्यावे. तांदुळाचे पीठ हळू हळू घालावे. आंच मंद ठेवावी.
  2. कणिक एकत्र येईपर्यंत मिक्स करावे. कमी ज्योत वर हे करा कणीक थोडं चिकट झाले असेल तर पीठ घालून चांगले मिक्स करावे.
  3. ज्योत बंद करून पॅन 5-7 मिनीट झाकून ठेवावा. हात वर थोडे साधे पाणी लावून पीठ व्यवस्तीत मळून घ्या.
  4. सारण - नॉनस्टीक पॅनमध्ये तेल तापत ठेवावे. त्यात बारीक चिरलेली लसूण घालावी. उच्च मध्यम ज्योत वर काही सेकंद ढवळणे.
  5. बारीक चिरलेला कांदा घालावा. पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
  6. मिरची घालून मिक्स करावे. काही सेकंद शिजवावे. मिन्सड किंवा एकदम बारीक केलेल्या किंवा मिक्सर मधून काढलेल्या भाज्या, मीठ, काळीमिरी पूड टाका मध्यम तेलात जास्तीत जास्त एक मिनिट शिजवा. दरम्यान ढवळत राहा.
  7. सोया सॉस टाका . चांगले मिक्स करावे ज्योत बंद करा
  8. क्रीम चीज किंवा प्रक्रिया केलेले( प्रोसिस्ज्ड) चीज टाका. एकत्र होईपर्यंत मिक्स करावे. बाजूला ठेवा.
  9. मोदक साठी - पालकाच्या पीठ 8- 9 समान छोट्या गोळ्यात विभागून घ्या.
  10. हात वर काही तेल किंवा तांदूळ पीठ लावा. एक कणकेचा गोळा घ्या आणि बोटांचा वापर करून सपाट करणे. 4-5-इंच व्यासाची गोल पोळी बनवा.
  11. मध्यभागी 1 टेबलस्पून तयार मसालेदार गाजर- कोबी-चीज मिश्रण भरा. सरणाभोवती पट्ट्या किंवा पाकळ्या करण्यास प्रारंभ करा. मी 7-8 पाकळ्या केल्या किंवा मोदक साचा वापरा.
  12. सर्व कडा एकत्र एकत्र करा आणि काळजीपूर्वक त्या पिंच करा. पीठ जास्त असल्यास काढून टाकावे. उर्वरित कणकेच्या गोळ्या वापरून प्रक्रियेची पुनरावृत्ती करा.
  13. स्टीमर किंवा इडलीचा साचा तयार करून त्यात १/२ कप पाणी घालावे. पाणी उकळून द्या.
  14. इडली प्लेटवर तूप लावा. प्रत्येक मोदक पुरेशी जागा सोडून साच्यावर ठेवा.
  15. ५ ते ७ मिनीटे मध्यम आचेवर उकडून घ्या. गॅस बंद करा. २ मिनिटे तसेच राहू द्या.
  16. झाकण काढून टाका. त्यांना काही सेकंड प्लेटवर च राहू द्या. एका प्लेटवर काढा.
  17. गरमा गरम, मसालेदार लाल तिखट चटणीबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Pranali Deshmukh
Jun-07-2018
Pranali Deshmukh   Jun-07-2018

Superb

Nayana Palav
Jun-06-2018
Nayana Palav   Jun-06-2018

Superb

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर