झटपट केळ्याचे पॅनकेक | Quick banana pancakes. Recipe in Marathi

प्रेषक Archana Chaudhari  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Quick banana pancakes. recipe in Marathi,झटपट केळ्याचे पॅनकेक, Archana Chaudhari
झटपट केळ्याचे पॅनकेकby Archana Chaudhari
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

झटपट केळ्याचे पॅनकेक recipe

झटपट केळ्याचे पॅनकेक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Quick banana pancakes. Recipe in Marathi )

 • गहू पीठ 1 कप
 • अंडं 1
 • ब्राऊन शुगर किंवा साधी साखर 3 मोठे चमचे
 • दूध 3/4 कप
 • बेकिंग पावडर 1/2 लहान चमचा
 • व्हॅनिला इसेन्स 1 लहान चमचा
 • बटर 1 मोठा चमचा
 • केळी 2
 • वरून घेण्यासाठी
 • 1 केळे बारीक काप केलेले
 • मध 1 लहान चमचा
 • अक्रोडचे तुकडे 2 चमचे

झटपट केळ्याचे पॅनकेक | How to make Quick banana pancakes. Recipe in Marathi

 1. मिक्सर मध्ये गहू पीठ, अंड,साखर,दूध, केळ, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स टाकून सगळे एकत्र येपर्यंत मिक्स करावे.
 2. एका भांड्यात काढून घ्या.
 3. पॅनला थोडेसे बटर लाऊन छोटे छोटे पॅनकेक करा.झाकण ठेवा.
 4. आता झाकण काढून पॅनकेकला सोनेरी रंग येईपर्यंत ठेवा.
 5. आता पॅनकेक काढा.
 6. खातांना वर केळ्याचे काप,मध,अक्रोडचे तुकडे टाका.

My Tip:

तुम्ही पॅनकेक वर क्रीम, आवडीचे फळे घेऊ शकता.

Reviews for Quick banana pancakes. Recipe in Marathi (0)