तमागोयकी (जापनीज ऑम्लेट) | Tamagoyaki ( Japanese Omelette) Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tamagoyaki ( Japanese Omelette) recipe in Marathi,तमागोयकी (जापनीज ऑम्लेट), Sujata Hande-Parab
तमागोयकी (जापनीज ऑम्लेट)by Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

तमागोयकी (जापनीज ऑम्लेट) recipe

तमागोयकी (जापनीज ऑम्लेट) बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tamagoyaki ( Japanese Omelette) Recipe in Marathi )

 • अंडी - 3
 • सोया सॉस- १/४ टीस्पून
 • साखर - १/४ टीस्पून
 • ग्राउंड किंवा कुटलेली काळी मिरी - १/२ टिस्पून
 • चवीनुसार मीठ 
 • तेल - १/२ टेबलस्पून

तमागोयकी (जापनीज ऑम्लेट) | How to make Tamagoyaki ( Japanese Omelette) Recipe in Marathi

 1. एका खोल बाउलमध्ये अंडी, सोया सॉस, कुटलेली काळी मिरी, साखर आणि मीठ घ्या. चांगले फेस येईपर्यंत फेटून घ्या.
 2. नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. तयार अंड्याचा मिश्रणाचा एक पातळ थर घाला. पॅन थोडे हलवून समान रीतीने पसरवा आणि कमी ज्योत वर काही सेकंद सेट होऊ द्या.
 3. लाकडी फोर्क किंवा काटा चमच्यांचा पाठचा भाग वापरून आम्लेट गुंडाळून घ्यावे.
 4. पहिल्यांदा दोन्ही बाजूनी दुमडून घ्या. नंतर गोलाकार रोल करून घ्या. मिश्रण तोडे ओले असतानाच हि क्रिया करावी.
 5. हा लॉग पॅन मधेच पण एका टोकापासून दूर ठेवा.
 6. परत अंड्याचे थोडे मिश्रण ओतून घ्या आणि समान पसरवून घ्या.
 7. काही सेकंड सेट झाल्यावर चमच्याने फोल्ड किंवा दुमडून घ्या. आणि जो रोल बनवून ठेवला होता त्याला घेऊनच रोल करून घ्या.
 8. प्रक्रिया तिसर्यांदा पुन्हा करा आणि सर्व अंडी मिश्रण वापरले जात नाही तोपर्यंत करा आणि सांगितलेल्या पद्धतीनेच रोल करा.
 9. झाल्यावर एग रोल एका ताटात कडून घ्या. एक अलुमिनिम फॉईल वापरून तो व्यवस्तीत त्यात दुमडून किंवा रोल करून घ्या.
 10. 4-5 मिनिटे बाजूला ठेवा. गरम सर्व्ह करा

My Tip:

कमी आचेवर आमलेट शिजवा ते रोल करण्यास सोपे जाते. बारीक चिरलेला कांदा किंवा मिरची देखील टाकू शकता.

Reviews for Tamagoyaki ( Japanese Omelette) Recipe in Marathi (0)