चीज गार्लिक ब्रेड स्टिकस | Quick Cheese Garlic Bread Sticks Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Quick Cheese Garlic Bread Sticks recipe in Marathi,चीज गार्लिक ब्रेड स्टिकस, Sujata Hande-Parab
चीज गार्लिक ब्रेड स्टिकसby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  12

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  8

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

4

0

चीज गार्लिक ब्रेड स्टिकस recipe

चीज गार्लिक ब्रेड स्टिकस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Quick Cheese Garlic Bread Sticks Recipe in Marathi )

 • ब्राउन ब्रेड - ४-५ ( सरळ कापून तुकडे केलेले)
 • लसूण मिन्सड किंवा बारीक ठेचून घेतलेली - १ टीस्पून 
 • लाल मिरची जाडसर वाटलेली किंवा फ्लेक्स - १/२ -१ टीस्पून 
 • ओरेगॅनो - १ टीस्पून 
 • बेसिल पाने सुकलेली - १ टीस्पून
 • तेल - १ १/२ टेबलस्पून 
 • मीठ एक छोटीसी चिमूटभर
 • किसलेले चीज - ३-४ टेबलस्पून (कोणतेही जे उपलब्ध असेल ते.)

चीज गार्लिक ब्रेड स्टिकस | How to make Quick Cheese Garlic Bread Sticks Recipe in Marathi

 1. ओव्हन २०० डिग्री सेल्सिअस ला गरम करून घेणे. ब्रेड चे उभे तुकडे करून घ्या.
 2. बेसिल पाने, ओरेगॅनो ग्राइंडर ला लावून जाडसर वाटून घ्या.
 3. एका छोट्या वाडग्यात तेल घेऊन त्यात जाडसर वाटलेली लसूण, बेसिल पाने, ओरेगॅनो, मीठ, तेल घेऊन एकत्र करावे.
 4. चांगले मिक्स करून थोडावेळ झाकून बाजूला ठेवावे. जास्त मीठ वापरू नये. ब्रेडमध्ये आणि चीज मध्ये आधीच थोडे मीठ असते.
 5. एका बेकिंग ट्रे मध्ये ब्रेड चे तुकडे ठेवून मसाले इन्फयुज्ड तेल त्यावर व्यवस्तिथ लावून घ्यावे.
 6. पूर्व गरम केलेल्या ओव्हन मध्ये 4-5 मिनिटे किंवा टॉप कुरकुरीत ब्राउन होई पर्यंत बेक करावे.
 7. बाहेर काढून किसलेले चीज पसरवून परत ओव्हन मध्ये १-२ मिनिटांसाठी बेक करावे. तापमान तेच ठेवावे.
 8. क्रीम चीज डीप किंवा टोमॅटो केचअप बरोबर सर्व्ह करावे.

My Tip:

ब्रेड स्टिक जास्त बेक किंवा भाजू नयेत. करपू शकतात. थोड्या वेळाने थंड झाल्यावर त्या आणखीन कडक होतात. तेल जास्त लावू नये.

Reviews for Quick Cheese Garlic Bread Sticks Recipe in Marathi (0)