आंब्याचं सांदण / धोंडस | Aambyache Saandan / Dhondas Recipe in Marathi

प्रेषक Sudha Kunkalienkar  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aambyache Saandan / Dhondas recipe in Marathi,आंब्याचं सांदण / धोंडस, Sudha Kunkalienkar
आंब्याचं सांदण / धोंडसby Sudha Kunkalienkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  2

  1 /2तास
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

आंब्याचं सांदण / धोंडस recipe

आंब्याचं सांदण / धोंडस बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aambyache Saandan / Dhondas Recipe in Marathi )

 • इडली रवा १ कप 
 • आंब्याचा गर अर्धा कप
 • ताजा खवलेला नारळ अर्धा कप 
 • चिरलेला गूळ अर्धा ते पाऊण कप 
 • केशर ३-४ काड्या दुधात भिजवून 
 • वेलची पूड पाव चमचा 
 • साजूक तूप अर्धा चमचा आणि थाळीला लावायला 
 • मीठ चवीनुसार 
 • खायला देताना 
 • नारळाचा गूळ, वेलची घातलेला गोड रस / तूप 

आंब्याचं सांदण / धोंडस | How to make Aambyache Saandan / Dhondas Recipe in Marathi

 1. अर्धा चमचा तूप घालून घालून इडली रवा भाजून घ्या. जरा रंग बदलला की गॅस बंद करा. 
 2. आंब्याचा गर काढून गाळून घ्या.  पाणी घालू नका. 
 3. नारळ आणि गूळ मिक्सर मध्ये एकत्र करून घ्या. फार बारीक वाटू नका . 
 4. आता रवा, आंब्याचा गर, नारळ, गूळ, केशर, वेलची आणि मीठ एकत्र  करा. इडलीच्या पिठासारखं भिजवा. 
 5. २ तास झाकून ठेवा. 
 6. आता मिश्रण फुगेल. परत पाणी घालून इडलीच्या पिठाएवढं पातळ करा. 
 7. इडली पात्रात पाणी गरम करा. एका थाळीला तूप लावून त्यात मिश्रणाचा  १ सेमी जाडीचा थर द्या.  १५-२० मिनिटं वाफवून घ्या. 
 8. गार झाल्यावर वड्या पाडा आणि नारळाच्या गोड रसाबरोबर / तुपाबरोबर खायला द्या.  

Reviews for Aambyache Saandan / Dhondas Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo