आंबा पॅनकेक विथ कंपोट | Mango Pancake with Compote Recipe in Marathi

प्रेषक Sujata Hande-Parab  |  8th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mango Pancake with Compote recipe in Marathi,आंबा पॅनकेक विथ कंपोट, Sujata Hande-Parab
आंबा पॅनकेक विथ कंपोटby Sujata Hande-Parab
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

आंबा पॅनकेक विथ कंपोट recipe

आंबा पॅनकेक विथ कंपोट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mango Pancake with Compote Recipe in Marathi )

 • तेल - २-३ टेबलस्पून तळण्यासाठी
 • पीठी साखर - 3 - ४ टेबलस्पून आपल्या चवीनुसार कमी जास्त करा
 • आंबा पल्प किंवा घट्ट रस - १/२ कप (हापूस आंबा किंवा कोणताही खूप गर असणारा आणि सुवासिक)
 • दूध - १ - १ १/४ कप
 • कॉर्न फ्लोर सफेद - १/४ कप
 • मैदा - १ कप
 • बेकिंग पावडर - १/२ टीस्पून
 • बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा - १/२ टीस्पून
 • सजावटीसाठी आणि सर्व्ह करण्यासाठी - मध - २-३ टेबलस्पून
 • चेरीस - १ टेबलस्पून बारीक कापलेली
 • काजू - १-२ टेबलस्पून बारीक कापलेले
 • कंपोट साठी - पिकलेला बारीक तुकडे केलेला आंबा - १/२ -१ कप (हापूस आंबा किंवा कोणताही खूप गर असणारा आणि सुवासिक)
 • पिठी साखर - ४-५ टेबलस्पून 
 • पाणी - १/२ - ३/४ कप

आंबा पॅनकेक विथ कंपोट | How to make Mango Pancake with Compote Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात मैदा, कॉर्न फ्लोर, खाण्याचा सोडा आणि बेकिंग पूड चालून घ्या.
 2. त्यात आंब्याचा घट्ट रस, पीठी साखर आणि दूध घालून हळू हळू ढवळून घ्या.
 3. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात एक वाटी चमचा आंबा पीठ मिश्रण घाला आणि पण गोलाकार फिरवा. आच पीठ टाकताना मध्यम जास्त असू द्या. नंतर लगेचच तो मंद मध्यम ठेवा. नाही तर पॅनकेक करपतील
 4. काही सेकंदांनी थोडे थोडे बुडबुडे पॅनकेक वर येतील आणि त्याच्या बाजू सुटू लागतील. तेव्हा तो परतून घ्या.
 5. दुसरी बाजू १ मिनिटे भाजून घ्या. काढून प्लेट वर ठेवा. असा प्रकारे सगळे पॅनकेक करून घ्या.
 6. कंपोट - एका नॉन स्टिक पॅन मध्ये आंब्याचे तुकडे, साखर आणि पाणी घालून ३-४ मिनिटे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या.
 7. काही आंब्याचे तुकडे चमच्याने मॅश करा. शेगडी बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
 8. पॅनकेक - एक पॅनकेक प्लेटवर ठेवा. त्यावर केलेले आंबा कंपोट व्यवस्तीत पसरावा.
 9. दुसरा पॅनकेक वर ठेवा. त्यावर देखील आंबा कंपोट व्यवस्तीत पसरावा.
 10. असा प्रकारे तीन किंवा चार वेळा हि कृती रिपीट करा.
 11. सर्व्ह करताना वरून आंबा कंपोट, कापलेले काजू, मध आणि चेरीस घालून सर्व्ह करा.

My Tip:

मधाऐवजी मॅपल सिरपचा वापर,विविध फळाबरोबर हे सर्व्ह करू शकता.मिश्रण जास्त घट्ट असल्यास समानतापमानावर असलेले दूध वापरू शकता

Reviews for Mango Pancake with Compote Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती