हांडी चिकन फ्राय | handi chicken fry Recipe in Marathi

प्रेषक Lata Vilaspure  |  12th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • handi chicken fry recipe in Marathi,हांडी चिकन फ्राय, Lata Vilaspure
हांडी चिकन फ्रायby Lata Vilaspure
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    0

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

8

0

About handi chicken fry Recipe in Marathi

हांडी चिकन फ्राय recipe

हांडी चिकन फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make handi chicken fry Recipe in Marathi )

  • चिकन 1/2 किलो.
  • आलं लसूण कोथिंबीर पेस्ट 2 टेबल स्पून
  • हळद 1/2 चमचा
  • लिंबू रस 1 चमचा
  • लाल तिखट 2 चमचे
  • काळं तिखट 1चमचा
  • गरम मसाला 1चमचा
  • चिकन मसाला 1चमचा
  • मीठ चवीनुसार
  • तेल 4टेबल स्पून
  • कच्ची कोथिंबीर 1 टेबल स्पून

हांडी चिकन फ्राय | How to make handi chicken fry Recipe in Marathi

  1. चिकनला आलं लसूण कोथिंबीर पेस्ट. हळद. लिंबू रस टाकून मॅरीनेट करून ठेवा 5 मिनिटे. खापराच्या हांडित (कढई पण चालते) तेल गरम करून त्यात ग्रेव्ही घाला (3 कांदे उभे चिरून एकदम ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्या दुसर्या कढईत एक वाटी खोबरे कीस ब्राऊन रंग होईपर्यंत भाजून घ्या त्यात 10 पाकळ्या लसूण दोन इंच आलं टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या) ग्रेव्हीला तेल सुटले कि त्यात अर्धी वाटी टोमॅटो प्युरी घाला. त्यात लाल तिखट काळं तिखट गरम मसाला चिकन मसाला मीठ घालून मॅरीनेट केलेले चिकन घालून 10शिजवून घ्या वरून कच्ची कोथिंबीर घाला

My Tip:

हि डिश लवकर होते. आणि खूप टेस्टी लागते पोळी आणि भाकरी बरोबर खाऊ शकता .

Reviews for handi chicken fry Recipe in Marathi (0)