बिस्किट भेळ | Biscuit Bhel Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  13th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Biscuit Bhel recipe in Marathi,बिस्किट भेळ, Vaishali Joshi
बिस्किट भेळby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  5

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

बिस्किट भेळ recipe

बिस्किट भेळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Biscuit Bhel Recipe in Marathi )

 • सॉल्टी बिस्किट १५-२०
 • कांदा १ मोठा
 • टोमेटो १ मोठा
 • हिरवी मिर्ची १ (ऐछीक)
 • स्वीटकॉर्न १/२ वाटी
 • बटाटा १
 • सोयाचंक १/२ वाटी
 • चाट मसाला
 • तिखट
 • मीठ
 • हिरवी चटनी (मिर्ची + पुदीना + कोथिंबीर )
 • आलुभुजिया शेव
 • लिंबू रस

बिस्किट भेळ | How to make Biscuit Bhel Recipe in Marathi

 1. सर्व प्रथम तयारी करा -बटाटा सोलून त्याचे अगदी छोटे छोटे चौकोन तुकडे करुन घ्या . गैस वर भांड्यात पाणी उकळत ठेउन कापलेले बटाटे टाका सोबत स्वीटकॉर्न पण टाका २ मिनिट उकळल्यावर गैस बंद करा , त्यात सोया चंक टाकुन झाकण ठेवा .कांदा ,मिर्ची , टोमेटो बिया काढून,कोथिंबिर चिरुन घ्या .मिर्ची कोथिम्बिर पुदीना एकत्र करुन चटनी करून घ्या
 2. २ मिनिटांनंतर बटाटे ,स्वीटकॉर्न , सोया चंक्स पाण्य़ातून काढून चाळनीत काढ़ा आणि त्यातले सोया चंक्स पिळून घ्या
 3. एक बाऊल मधे सगळे बिस्किट्स तोडून घाला (एक बिस्किट चे साधारण ५-६ तुकडे करा )त्यात बटाटे , स्वीटकॉर्न , सोया चंक्स , कांदा , मिर्ची , टोमेटो , तिखट , मीठ , चाट मसाला , हिरवी चटनी , आलू भुजिया , लिंबू रस आणि कोथिंबिर घालून मिक्स करा .
 4. सर्व्हिंग प्लेट मधे काढून कोथिंबीर आणि आलूभुजिया शेव ने गार्निश करून खायला द्या

My Tip:

हिरवी मिर्ची आवडत किंवा चालत नसेल तर शिमला मिरचीचे काप करून घाला

Reviews for Biscuit Bhel Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo