सिक्रेट ऑम्लेट | Secreat omlet Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  14th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Secreat omlet recipe in Marathi,सिक्रेट ऑम्लेट, Pranali Deshmukh
सिक्रेट ऑम्लेटby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  7

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  13

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

सिक्रेट ऑम्लेट recipe

सिक्रेट ऑम्लेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Secreat omlet Recipe in Marathi )

 • 2 अंडी
 • 1 बारीक चिरलेला कांदा
 • 2 tbs कोथिंबीर
 • 1 tbs तिखट
 • 1/2 tbs हळ्द
 • मीठ
 • तेल 2 tbs
 • गरम मसाला 1 tbs
 • धने पूड 1 tbs
 • मळलेली कणिक 2 पोळ्यांची

सिक्रेट ऑम्लेट | How to make Secreat omlet Recipe in Marathi

 1. अंडी फोडून एका बाउल मध्ये काढा
 2. त्यामध्ये तेल सोडून सर्व साहित्य मिक्स करा.
 3. तवा ठेवा आणि जरा जाडसर पोळी लाटा
 4. दोन्ही बाजूनी शेकून घ्या
 5. ती जेव्हा फुगायला लागते त्यावेळी चाकूने वरचा पापुद्रा वर उचला आणि अगदी लगेच पोळीच्या मध्ये अंड्याचं मिश्रण भरा.
 6. दोन्ही बाजूनी पोळी तेल सोडून खरपूस भाजून घ्या .अंड्यामुळे पोळी आणखी फुगायला लागेल .
 7. एका प्लेटमध्ये घेऊन चार तुकडे कापा .कोथिंबीर भुरभुरून सॉस सोबत सर्व्ह करा.

Reviews for Secreat omlet Recipe in Marathi (0)