आंबोळी | AMBOLI Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  16th Jun 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • AMBOLI recipe in Marathi,आंबोळी, आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  7

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

आंबोळी recipe

आंबोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make AMBOLI Recipe in Marathi )

 • तांदुळाचे पीठ 2 वाटी
 • मेथी पावडर 1 मोठा चमचा
 • मिठ चवीनुसार
 • कोमट पाणी
 • चटणी साठी अर्धी वाटी खोबरे
 • थोडीशी कोथिंबीर
 • मिरची 2
 • मीठ चवीनुसार
 • साखर 1/2 चमचा
 • लसूण 2,3 पाकळ्या
 • दही 2 ते 3 चमचे

आंबोळी | How to make AMBOLI Recipe in Marathi

 1. तवा तापत ठेवावा . तांदळाच्या पिठात मिठ, मेथी पावडर घालून लागेल तसे कोमट पाणी घालून मिक्स करावे. तव्यावर थोडे तेल घालून हे मिश्रण पसरवावे. डोश्याला पसरवतात तसेच. झाकण 2 मिनिटे ठेवावे. नंतर परतून घ्यावे. आंबोळी तयार आहे. चटणी चे सगळे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावे. आंबोळी बरोबर चटणी व लोणी छान लागते.

My Tip:

यात कांदा घालून केले तर ती पण आंबोळी छान लागते. झटपट होणारा पदार्थ आहे , break fast ला छान

Reviews for AMBOLI Recipe in Marathi (0)