झटपट गाजराचे लोणचं | Instant Carrot pickle Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  17th Jun 2018  |  
1 from 1 review Rate It!
 • Instant Carrot pickle recipe in Marathi,झटपट गाजराचे लोणचं, Aarti Nijapkar
झटपट गाजराचे लोणचंby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

1

झटपट गाजराचे लोणचं recipe

झटपट गाजराचे लोणचं बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Carrot pickle Recipe in Marathi )

 • गाजर २ ते ३
 • आलं १ इंच
 • मोहरी १ लहान चमचा
 • हिंग १ लहान चमचा
 • मोहरीची डाळ १ मोठा चमचा
 • मेथीची डाळ १/२ लहान चमचा
 • हळद १/२ लहान चमचा
 • लाल तिखट १ मोठा चमचा
 • मीठ १ लहान चमचा किंवा स्वादानुसार
 • व्हिनेगर १ मोठा चमचा
 • लिंबाचा रस २ मोठे चमचे
 • तेल २ मोठे चमचे
 • तेल १/२ लहान चमचा (गाजर परतवण्यासाठी)

झटपट गाजराचे लोणचं | How to make Instant Carrot pickle Recipe in Marathi

 1. प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यात आल्याचे पातळ लांब कापलेले काप घालावे व तेलात परतवून घ्यावे
 2. आता गाजराचे कापलेले लांब काप हे पॅन मध्ये घालून ३० सेकंद तेलावर परतवून घ्या गाजर फार शिजवायचे नाही आहेत
 3. मग एका थाळीत काढा
 4. त्याच पॅन मध्ये २ मोठे चमचे तेल गरम करून त्यात मोहरी घाला मोहरी तडतडली की मोहरीची डाळ , हिंग , मेथीची डाळ , हळद , लाल तिखट व मीठ घालून एकजीव करून घ्या गॅस बंद करून मिश्रण थोडे कोमट करून घ्या 
 5. मग त्यात व्हिनेगर व लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या आता थाळीत काढलेले आलं व गाजर पॅन मध्ये घालून मिश्रण छानसं एकत्र करून घ्या 
 6. आता गाजराचे लोणचं तयार आहे
 7. व्यवस्थित गार झाले की हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवा लगेचच हे लोणचे खाऊ शकता
 8. फ्रीज मध्ये आठवडाभर हे लोणचं ठेवू शकता

My Tip:

गाजराचे तुकडे आवडीनुसार कापावे पण फार जाड नसावे गाजर ऐवजी हिरवी काकडी वापरू शकता काकडीचे बिया काढावेत जास्त तेल व मिठाची

Reviews for Instant Carrot pickle Recipe in Marathi (1)

sharwari vyavhare5 months ago

Reply